शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

अमरावती, अचलपूरला ‘ट्रूनॅट’ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

‘लॅपटॉप’च्या आकाराची ही मशीन गरजेनुसार कुठेही हलविता येणार आहे. यातील कार्टेजवर संशयिताच्या स्वॅबची तपासणी केली जाईल. सुरुवातीला ही मशीन क्षयरुग्णांच्या चाचणीसाठी तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाचे संक्रमित मोठ्या प्रमाणात निष्पन्न होत असल्याने या मशीनमध्ये थोडाफार बदल करून नव्याने विकसित करण्यात आली व आता कोरोनाच्या हायरिस्क असणाऱ्या रुग्णांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंशयितांच्या नमुन्याचा तासाभरात रिपोर्ट : मशीनवर पॉझिटिव्ह दाखविले तरच स्वॅब तपासणी

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचे संक्रमित रुग्ण त्वरेने निष्पन्न व्हावेत व त्यांच्यावर लगेच उपचार होऊन अन्य व्यक्ती संक्रमित होऊ नये, यासाठी जिल्ह्यात अमरावती व अचलपूरला प्रत्येकी एक ‘ट्रूनॅट’ मशीन उपलब्ध झाल्याची ‘गुड न्यूज’ आहे. या मशीनवर आता तासाभरात चाचणी होईल. या मशीनचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यासच ‘त्या’ रुग्णाची ‘आरटी-पीसीआर’ तपासणी केली जाणार असल्याने विषाणू परीक्षण प्रयोगशाळेवरील ताण काहीसा कमी होणार आहे.‘लॅपटॉप’च्या आकाराची ही मशीन गरजेनुसार कुठेही हलविता येणार आहे. यातील कार्टेजवर संशयिताच्या स्वॅबची तपासणी केली जाईल. सुरुवातीला ही मशीन क्षयरुग्णांच्या चाचणीसाठी तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाचे संक्रमित मोठ्या प्रमाणात निष्पन्न होत असल्याने या मशीनमध्ये थोडाफार बदल करून नव्याने विकसित करण्यात आली व आता कोरोनाच्या हायरिस्क असणाऱ्या रुग्णांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणार आहे. या मशीनमध्ये चाचणी पॉझिटिव्ह आल्यासच त्या व्यक्तीवर कोविड-१९ चे उपचार केले जाणार आहे. या मशीनवर ‘राऊंड दी क्लॉक’ एका दिवसात किमान २४ ते ४८ नमुन्यांची तपासणी होऊ शकते. यामुळे लॅबवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. कोरोना संक्रमित त्वरेने निष्पन्न होतील, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली. ही एक ‘स्ट्रिमिंग टेस्ट’ आहे. सद्यस्थितीत कोरोना संशयित रुग्ण वाटल्यास त्या प्रत्येक व्यक्तीच्या घशातील स्त्रावाची तपासणी आरटी-पीसीआर पद्धतीने केली जाते. यानंतर ट्रूनाटमध्ये पॉझिटिव्ह आल्यासच थ्रोट स्वॅबची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली. या मशीनला ‘आयसीएमआर’ ने मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून आतापर्यंत ९२७८ नागरिकांची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलेली आहे. मंगळवारी १७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. २११० संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापौकी आतापर्यंत १७१३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ८४ पॉझिटिव्ह व १९६ अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये १२ रुग्णांचा मृत्यू व ४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी ६५ नमुने तपासणीसाठी पाठविले, तर रात्रीपर्यंत १३९ अहवाल प्राप्त झालेत, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.‘ट्रूनॅट’वर निगेटिव्ह आल्यास ‘आरटी-पीसीआर’ नाहीजिल्ह्यास उपलब्ध होत असलेल्या दोन ट्रूनॅट मशीनवर संशयित व्यक्तीचा थ्रोट स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीच्या घशातील स्रावाचा नमुना विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठवून ‘आरटी-पीसीआर’ करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र, चाचणी पॉझिटिव्ह आल्यासच पुन्हा लॅबद्वारे तपासणी केली जाणार आहे. यामध्ये नमुना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ‘त्या’ रुग्णावर कोविड -१९ चा उपचार केला जाईल. यामुळे लॅबवरचा ताण कमी होऊन संक्रमित व्यक्ती लवकर निष्पन्न होणार आहे.या ‘ट्रूनॅट’ मशीनद्वारे दिवसाला २४ ते ४८ या दरम्यान अहवाल प्राप्त होतील व यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीची पुन्हा थ्रोट स्वॅब तपासणी केली जाईल. चाचणी निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता राहणार नाही.- डॉ विशाल काळे, एमओएच, महापालिकाही एक स्ट्रिमिंग टेस्ट आहे. यासाठी दोन ‘ट्रूनॅट’ ’ मशीन जिल्ह्यास उपलब्ध होणार आहे. यापैकी एक अमरावतीला, तर दुसरी मशीन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयास देण्यात येईल. याद्वारे संशयित नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी केली जाईल.-डॉ श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या