मूर्तिजापूर टी-पॉर्इंटजवळील घटना : आरोपी तासभरात गजाआड दर्यापूर : सिमेंटचे पोते घेऊन मूर्तिजापूरकडे जात असताना दोन भामट्यांनी चाकुचा धाक दाखवून भरदिवसा ट्रकचालकाला लुटले. ही घटना दर्यापूर येथील मूर्तिजापूर टी पाँईटजवळ रविवारी दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून एका आरोपीला तासाभरार गजाआड केले. फिर्यादी सुनील रोतम संयम (रा. डोंगरगाव) हा ट्रक चालक दर्यापूर येथील सिंमेटचे पोते घेऊन मूर्तिजापुर तालुक्यात जात असताना मूर्तिजापूर टी-पाँईट जवळ दोन अज्ञात आरोपींने ट्रकला थांबविले. लगेच ट्रकचालकाला चाकुचा धाक दाखविला व पैसे देण्यास सांगितले. त्याच्या पॉकिटातील ११०० रुपये व १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पळ काढला. या घटनेनंतर ट्रक चालकाने आरोडाओरड केली. या घटनेची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे, वाहतूक पोलीस प्रवीण दाभणे, प्रशांत ढोके, मंगेश वानखडे आदी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून यातील एका आरोपीला बाभळी जंगलातून तासाभरातच गजाआड केले. मो. शादिक मो. ईसा (२७,रा. अमरावती) असे आरोपीचे नाव असून यातील एक अज्ञात आरोपी पडून गेला आहे. चाकुचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनेनंतर अनेक तरुण युवकही या आरोपींच्या मागे पळत सुटले होते. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून इतर पोलीस ठाण्यांतही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून इतर चोरीचे गुन्हे उघड होण्यास मदत होईल, असे ठाणेदार गवारे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तासभरात आरोपीला अटक करून ठाणेदार नितीन गवारे यांनी डॅसिंग पोलिसिंग दाखविली आहे, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले
By admin | Updated: December 26, 2016 00:28 IST