अमरावती : येथील शंकरनगर परिसरातील स्टेट बँक कॉलनी, प्रमोद कॉलनी आदी भागात रस्त्याची सोय व्हावी, यासाठी महापालिकेने सुमारे एक हजार चौ. कि. ची जागा हस्तातंरीत केली होती. या जागेच्या मोबदल्यात महापालिकेला रक्कम (टीडीआर) देणे आवश्यक होते. मात्र शेत एकाच व्यक्तीच्या नावावर असताना आज टीडीआर सामाईक पाच जणांचे नावे काढण्याचा घाट प्रशासनाने रचला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना टीडीआरचे ८५ लाख रुपये काढण्यासाठी मोठी रस्सीखेच होत असल्याचा आरोप विजयसा उर्फ अर्जूनसा मामर्डे यांनी केला आहे.स्थायी समितीचे सभापती मिलिंद बांबल यांना पाठविलेल्या कायदेतज्ञांच्या नोटीसनुसार, विजयसा मामर्डे यांनी मौजे राजापेठ सर्वे क्र. २७/१ मध्ये १९९६ रोजी रस्ता निर्मितीसाठी महापालिकेने एक हजार १२५ चौ. कि. एवढी जागा हतातंरित केली होती. या जागेच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचे ठरविण्यात आले. आताची स्टेट बँक कॉलनी, प्रमोद कॉलनी ज्या जागेवर आहे ती जमिन यापूर्वी विजयसा मामर्डे यांच्या मालकीची होती. ७/१२, पीआर कार्ड, एनए आदेश, खरेदीखत आदी जमिनीशी असलेले सर्व व्यवहार हे विजयसा मामर्डे यांच्याच नावे असताना महापालिकेने टीडीआर हे सामाईकपणे काढण्याचा निर्णय घेतलयचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. सदर शेत हे मालकीचे होते. त्यावेळी मुलबाळ नव्हते म्हणून त्यावेळी सर्वे क्र.२७/१ मधील काही वाटा हा माया गंगाराम छत्रीय, जयराम शंकरसा मामर्डे, संजय शंकरसा मामर्डे व राजेंद्र शंकरसा मामर्डे यांना देण्यात आला. मात्र शेत हे त्यावेळी विजयसा मामर्डे यांच्याच नावे होते. त्यावेळी झालेले व्यवहारही विजयसा मामर्डे यांनीच हाताळले असे असताना टीडीआर ची रक्कम सुद्धा ही विजयसा मामर्डे यांच्याच नावे काढली जावी, असे नोटीसीत म्हटले आहे. महापालिकेने ९०० चौ.कि.मी. जागेच्या टीडीआर देण्याला मंजुरी दिली आहे. परंतु जागा ही शेत सर्वे क्र. २७/१ ची घेतली असताना यात २६/१ चा उल्लेख करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विजयसा मामर्डे यांनी केला आहे. महापालिकेत टीडीआर काढताना प्रशासनाकडून काही बाबी अकारण घुसविण्याचा डाव अधिकारी काढत असून हा प्रकार थांबवून न्याय प्रदान करावा, अशी मागणी विजयसा मामर्डे यांनी केली आहे.
महापालिकेत टीडीआरमध्ये घोळ
By admin | Updated: December 4, 2014 23:02 IST