शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

त्रेता युगाच्या महानायकाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:01 IST

मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील माती व विठ्ठल रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील वशिष्ठा नदीचे जल नेण्यात आले. त्यामुळे तिवसा तालुक्याचे या रामपर्वाशी ऋणानुबंध जुळले आहेत.

ठळक मुद्देराम मंदिराचे भूमिपूजन, भाजप कार्यालयात जल्लोष

अमरावती: अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडताच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा, शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजापेठ येथील भाजप कार्यालयात एकत्र येवून जल्लोष केला. कार्यालयात दिवे लावून रोषणाई करण्यात आली. यावेळी बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा शहरध्यक्ष किरण पातुरकर यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची पूजा करुन लाडुचा प्रसाद वाटप केला. यावेळी महामंत्री गजानन देशमुख, महापौर चेतन गावंडे, रवींद्र खांडेकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, उपमहापौर कुसुम साहु, स्थायी समिती सभापती राधा कुरील, पक्षनेता सुनील काळे, सुरेखा लुंगारे, रिता मोकलकर, अजय सारस्कर, प्रणीत सोनी, बलदेव बजाज, लता देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताळे, आत्माराम पुरसवाणी, शिल्पा पाचघरे आदी उपस्थित होते.विहिंपच्यावतीने ५१ कारसेवकांचे पूजनविश्व हिंदू परिषदेच्यावतीने येथील एकवीरा देवी मंगल कार्यालयात राममंदिर निर्माण आंदोलनातील ५१ कारसेवकांचे पूजन आणि स्वागत करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू, बंटी पारवानी, दिनेश सिंह, चेतन वाटणकर व बजरंग दलाचे सुरेश चिकटे, उमेश मोवाळे, विजय खडसे यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.पालकमत्र्यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेसचा जल्लोषतिवसा : मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील माती व विठ्ठल रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील वशिष्ठा नदीचे जल नेण्यात आले. त्यामुळे तिवसा तालुक्याचे या रामपर्वाशी ऋणानुबंध जुळले आहेत. त्यादृष्टीने मोझरीतील राम मंदिर फुलांनी सजविण्यात आले. दिव्याची आरास करण्यात आली. लाडुवाटपसुद्धा करण्यात आले. याशिवाय घरांपुढे रांगोळी, तर चौकाचौकांत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक सचिन गोरे, योगेश वानखडे, उमेश राऊत, अंकुश देशमुख, सागर राऊत, जितू अडसपुरे, रोशन ठाकरे, गोरव ढोरे, ऋषीकेश ढोरे, आशिष तातोडे, यज्ञेश तिजारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर