शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राष्ट्रसंतांना साश्रृनयनांनी मौन श्रद्धांजली, लाखो गुरूदेव भक्तांची मांदियाळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 19:52 IST

अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’ रुपी महामंत्र देणा-या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना   कानाकोप-यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो गुरुदेवभक्तांनी मंगळवारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण ‘मौन श्रद्धांजली’ अर्पण केली. 

गुरुकुंज मोझरी : अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून अखिल विश्व सुखी समृद्ध करण्याचा ‘ग्रामगीता’ रुपी महामंत्र देणा-या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना कानाकोप-यातून गुरुकुंजात आलेल्या लाखो गुरुदेवभक्तांनी मंगळवारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण ‘मौन श्रद्धांजली’ अर्पण केली. पूजापाठाचे कुठलेही अवडंबर न करता केवळ मौन पाळल्यामुळे गुरूकुंजात नीरव शांतता पसरली होती. २४ तास अविरत वाहणा-या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाकेही यावेळी थांबली.  राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन वद्य पंचमी शुक्रवार ११ आॅक्टोबर १९६८ रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी अविरतपणे गुरुकुंजात हा भावविभोर सोहळा आयोजित केला जात आहे. ‘मौन श्रद्धांजली’च्या मुख्य कार्यक्रमाला ३.३० वाजता सुरुवात झाली. ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने तमाम गुरूदेवभक्तांनी महासमाधीच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर आरती व सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. मौन श्रद्धांजलीसाठी देशभरातून भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली होती. तालुका, स्थानिक व पोलीस प्रशासनानेदेखील तगडा बंदोबस्त लावला होता. भक्तांच्या वाहनांसाठी विशेष सोय करण्यात आली . यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एन.सुब्बाराव, सरचिटणीस जनार्दन बोथे, पुष्पा बोंडे, निवेदिता चौधरी, गौरी देशमुख यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संचालन महेश तिवारी यांनी केले. प्रार्थना गायन जया सोनारे, गोपाल सलोडकर, किशोर जगडे, शीतल मांडगवडे यांनी केले. त्यांना वादक रामेश्वर काळे यांनी साथ दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती