शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना ८५ टक्के अनुदानावर मिळणार विविध साहित्य

By गणेश वासनिक | Updated: November 20, 2023 18:16 IST

योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले, १५ डिसेंबरपर्यंत डेडलाईन.

अमरावती : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रातील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत मंजूर विविध योजनाचा लाभ घेण्याकरीता अनूसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन ८५ टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर काटेरीतार लोखंडी ऐंगलसह खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य, आदिवासी वनपट्टे धारकांना शेती अवजारे खरेदी करीता ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, आदिवासी वनपट्टे धारकांना शेळी गट खरेदीकरीता ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय, आदिवासी बांधवांना कुकूटपालनाकरीता ८५ टक्के अनुदानावर अर्थसहाय्य व आदिवासी युवतींना ८५ टक्के अनुदानावर शिलाई मशिन खरेदीकरीता अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी जि. अमरावती या ठिकाणी व नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती येथे तसेच मोर्शी, वरूड तिवसा व चांदुर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत उपकार्यालय मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या कार्यालयातील विकास शाखेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

अर्जाची यादी संगणकीकृत करणार- प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्य, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल. पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती