शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायबल' च्या शासकीय आश्रमशाळा, एकलव्य स्कूलची 'डीबीटी' बंद?

By गणेश वासनिक | Updated: January 13, 2024 16:50 IST

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वस्तू खरेदी; सन २०२३-२०२४ वर्षांपासून निविदा प्रक्रिया राबविली जाणार

अमरावती: आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा आणि एकलव्य स्कूलच्या विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) या योजनेवर काही अंशी ब्रेक लावला आहे. राज्य शासनाने काही वस्तू डीबीटीतून वगळण्याचा निर्णय घेतला असून, त्या वस्तू आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात शासकीय आश्रमशाळा ५४६ असून अडीच लाखांच्यावर विद्यार्थी आहेत. तर एकलव्य स्कूलची संख्या ३७ एवढी असून, २० हजाराच्यावर विद्यार्थी आहेत. काही वर्षांपूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या दिल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘डीबीटी’ ही योजना सुरू करण्यात आली. मात्र आदिवासी विकास विभागाचे उप सचिव वि. फ. वसावे यांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी एका पत्राद्वारे नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथील अपर आयुक्तांना डीबीटीतून वगळण्यात आलेल्या वस्तूची खरेदी करून निविदा प्रक्रिया राबवावी आणि विद्यार्थ्यांना त्या उपलब्ध करून द्याव्यात, असे कळविले आहे.

या वस्तू ‘डीबीटी’तून वगळल्याशैक्षणिक सत्र २०२३-२०२४ या वर्षात आदिवासी विद्यार्थ्याच्या शालेय वस्तू वगळण्यात आल्या आहेत. यात गणवेश, पीटी ड्रेस, पीटी शुज, पायमोजे, नाईट ड्रेस, शालेय साहित्य व लेखन सामग्री यांचा समावेश आहे. शासकीय आश्रमशाळा, एकलव्य स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

प्रती विद्यार्थी असे मिळायचे डीबीटीचे वार्षिक अनुदान- पहिली ते पाचवी : ७५०० रूपये- सहावी ते नववी: ८५०० रूपये- दहावी ते बारावी : ९५०० रूपये