आंदोलन : अत्याचारित आरोपींना कठोर शिक्षा द्याअमरावती : धारणी येथे तीन अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सोमवारी आदिवासी विद्यार्थी युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.धारणी शहरातील तीन अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिीनींवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपी शेख शाहरूख शेख कलीम, फयाज शेख, वसीम र्सौदागर, मोहसीन खॉ यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना निवेदनाव्दारे केली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष गंगाराग जांबेकर, राजेश धुर्वे, संजय काळे, रतन जांबेकर, सुनिल भिलावेकर आदी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थी संघटनेची जिल्हा कचेरीवर धडक
By admin | Updated: December 22, 2015 00:23 IST