शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

४० गावांतील आदिवासींनी घेतला सुटकेचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:04 IST

जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देपाहुणी स्थिरावलीच नाही : विघ्न टळल्याने श्रीगणेशाचे आगमन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भव:’ असे सुभाषित आहे. दोन महिन्यांपूर्वी मेळघाटच्या जंगलात आलेल्या पाहुणीने सळो की पळो करून सोडल्यानंतर मात्र यजमानांनाच भीती दाटून आली. एक दोन नव्हे, जवळपास ४० गावांत या वाघिणीने दहशत पसरविली. एकाला ठार करण्यासोबत दोघांना जखमी केले. गुरांचा फडशा पाडला. आदरतिथ्य सोडून जिवावर उठलेली अशी पाहुणी नकोच म्हणत तिला आणणाऱ्या वनविभागाला असंतोषाचा सामना करावा लागला. ती आपल्या गावात, शिवारात फिरकू नये, यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले. अखेर रविवारी सायंकाळी ती जेरबंद झाली अन् आदिवासी यजमानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एक वाघिण काय करू शकते, तिची दहशत कशी असते, याचा प्रत्यय मेळघाटच्या केकदाखेडा, दादरा, कावडाझिरी, खिडकी, रबांग, धोतरा, बिबामल, भादुबल्डा, कंजोली, राणीगाव, रानापिसा, भवर, रेहट्या, हिराबम्बई, शिवाझरी, डोलार, भांडुम, बैराटेकी, बोरखेडा, गडगामालूर, झिलांगपाटी, तातर, परसोली यांसह तब्बल ४० गावांतील हजारो आदिवासींना आला. ई-वन वाघिणीने पाळीव जनावरांवर हल्ला करण्यासोबत एका आदिवासीचा बळी घेतल्याने समस्थ आदिवासी बांधव प्रचंड दहशतीत आले होते. अगदी गरजच आहे म्हणून शेतात गेलेले आदिवासी सायंकाळपूर्वी घरी परतत होते. रात्रीही घराचा दरवाजा बंद केल्याची चारदा खातरजमा करीत होते. दोन महिन्यांत दुग्ध व्यवसाय आणि सर्वच कामे ठप्प पडली होती. आदिवासींमध्ये वाघिणीसोबतच व्याघ्र प्रकल्पाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. खासदार नवनीत राणा, मेळघाटातील आजी-माजी आमदारांनी या गंभीर प्रश्नांची मांडणी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयात केली होती. आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सबब, एकाचा बळी गेल्यानंतर मुक्त संचारासाठी सोडण्यात आलेल्या वाघिणीला रविवारी जेरबंद करून गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात नेण्यात आले.गणपती बाप्पा... मोरया!रविवारपर्यंत मेळघाटातील आदिवासी खेडी ई-वन वाघिणीच्या दहशतीत होती. तिला पकडून गोरेवाडा येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळताच सोमवारी दहशतीखाली असलेल्या गावांमध्ये गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. विघ्नहर्त्यानेच विघ्न दूर केल्याचा आनंद आदिवासींच्या चेहºयावर झळकत होता.दोन महिन्यांपासून आदिवासी वाघिणीच्या दहशतीत होते. रविवारी सायंकाळी गोलाई गावानजीक तिला पकडल्याची माहिती मिळाल्याने मोठे संकट टळले. आम्ही हर्षाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.- सविता जावरकर सरपंच, रबांगवाघिणीच्या दहशतीमुळे दैनंदिन कामकाज खोळंबले. मजुरी, शेती, चाºयाचा प्रश्न गंभीर झाला होता. रात्रीप्रमाणेच दिवसाही नागरिक घराबाहेर निघण्यास धजावत नव्हते. तिला जेरबंद केल्याने आमचा जीव भांड्यात पडला.गोपाल धुर्वे, उपसरपंच, मोर्गदा

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास