शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ

By admin | Updated: July 10, 2017 00:06 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे.

निराशा : धबधबे आटले, गर्दी वाढली, आता पावसाची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे. शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्याने पर्यटकांनी चिखलदऱ्यात गर्दी केली होती. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने निराश होऊन अनेक पर्यटक परतले. पावसाअभावी येथील प्रसिद्ध भीमकुंड, जगाडोह, देवी पॉर्इंट, पंचबोल पॉर्इंटवर हजारो फुट उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना मोहित करते. मात्र, अद्याप पाऊस बरसलेला नाही. आतापर्यंत पडलेल्या पावसाने बोडख्या टेकड्या तेवढ्या हिरव्या झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला. मात्र, खळखळ वाहणारे नदी-नाले कोरडे पडले आहेत. चिखलदऱ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दुसरा शनिवारृ आणि रविवारची सुटी पाहता पर्यटकांची संख्या गतवर्षीपेक्षा यावर्षी कमालीची वाढली आहे. नगरपालिकेच्या पर्यटन कर नाक्यावरून आकडेवारी स्पष्ट झाली.मध्यप्रदेश आणि विदर्भातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात चिखलदऱ्यात येतात. चिखलदरा नगरपालिकेच्या पर्यटक नोंदीवर नजर टाकली असता गतवर्षीपेक्षा येत्या जून आणि जुलै महिन्यात पर्यटकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. त्यानुसार जून २०१६ मध्ये ५,१४० प्रौढ पर्यटक आणि २०२ मुले अशा एकूण ५३४२ पर्यटकांनी हजेरी लावली होती. तर जुलै महिन्यात २३,८०० पर्यटकांची नोंद असून पालिकेला २ लक्ष ३७ हजार रुपयांचा पर्यटन महसूल मिळाला होता. यावर्षी २०१७ जूनमध्ये १७ हजार ७७४ प्रौढ तर २६४ मुल असे १८ हजार ३८ पर्यटकांनी हजेरी लावली. जुलै महिन्यात ९ तारखेपर्यंतच सात हजारांवर पर्यटकांचा आकडा गेला आहे. चिखलदरा नगर पालिकेला या सव्वा महिन्यातच २ लक्ष ३५ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. मात्र, आता पर्यटकांना पावसाची प्रतीक्षा आहे.पाऊस बेपत्ता, २११ मि.मी.चेरापुंजीची आठवण करून देत धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यात मनसोक्त भिजणारे पर्यटक असे काहीसे चित्र चिखलदरा पर्यटनस्थळावर दरवर्षी पाहायला मिळते. मात्र, यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कधी नव्हे अशी वणवण शहरवासियांना करावी लागत आहे. रविवार ९ जुलैपर्यंत २११ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी २०१६ मध्ये २९८ मि.मी.इतकी नोंद होती तर मागील ११ वर्षातील पावसाच्या नोंदीवर नजर टाकली असता सन २०१३ मध्ये सर्वाधिक २४७३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सन २००६ मध्ये सर्वात कमी ११७६ मि.मी. पाऊस चिखलदऱ्यात कोसळला आहे. गतवर्षी हत्तीडोहामध्ये मनसोक्त आंघोळीची मौज केली होती. मात्र, यावर्षी निराशा झाली. पावसाशिवाय चिखलदऱ्यात मजा नाही.- ध्ीारज ओझापर्यटक, बऱ्हाणपूरचिखलदऱ्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे येथील धबधबे आटले आहेत. पावसात पर्यटनाचे सौंदर्य खुलून येते. पर्यटकांवरच येथील व्यवसाय अवलंबून आहे.- राजेंद्रसिंह सोमवंशी, नगराध्यक्ष,