शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड संपली, वृक्षकटाई सुरू

By admin | Updated: July 10, 2017 00:11 IST

राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला.

मुख्य उद्देशालाच हरताळ: रस्ता चौपदरीकरणात हिरव्या झाडांची कत्तललोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्य शासनाने १ ते ७ जुलै या कालावधीत राज्यात चार कोटी वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या उपक्रमाला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. ‘एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष’ या ब्रिदानुसार तालुुक्यात दोन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. पंरतु, वरूड ते पांढुर्णा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे विकासाच्या नावावर वृक्ष लागवड अभियानालाच हरताळ फासण्याचा प्रकार सुरूअसल्याचे चित्र आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने चौपदरीकरणाला सुरूवात झाली. वरूड ते पांढुर्णा राज्य महामार्ग असून यामहामार्गाच्या कडेला हजारो झाडे आहेत. मात्र, विकास व रस्ते रूंदीकरणाच्या नावावर हजारो हिरव्या झाडांचा बळी जाणार आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याने निंब, बाभळीसह आडजातीच्या वृक्षांची देखील सर्रास कत्तल सुरु आहे. पर्यावरण संवर्धनाचे काय?शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व नेते मंडळी आपले फोटो प्रसिद्ध करून चांगलीच प्रसिद्धी मिळवितात. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष संगोपनाची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार होत नाही. हा पर्यावरण संवर्धनालाच हरताळ फासण्याचा प्रकार असल्याचे मत आता जाणकार व्यक्त करीत आहेत. एकीकडे वृक्षारोपण दुसरीकडे वृक्षकटाई असा दुटप्पी कार्यक्रम शासन राबवित असल्याचा आरोप केला जात आहे.