शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

वृक्ष कत्तल, फौजदारीचे आदेश

By admin | Updated: September 30, 2016 00:22 IST

पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाला हरताळ फासत महापालिकेच्या अख्त्यारितील बगिच्यात झाडांची अवैध कत्तल होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

महापालिकेच्या बगिच्यातील प्रकार : उद्यान विभाग अनभिज्ञअमरावती : पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाला हरताळ फासत महापालिकेच्या अख्त्यारितील बगिच्यात झाडांची अवैध कत्तल होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी दखल घेतली असून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.वृक्ष तर सोडाच झाडांची साधी फांदी जरी तोडायची झाल्यास वृक्षप्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. या समितीसमोर गेल्यानंतर परवानगी मिळेलच, याचीही शाश्वती नाही. मात्र हे सारे नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.साईनगर परिसरातील साबू ले-आउटमध्ये असलेल्या महापालिकेच्या एका बगिच्यातील ३ झाडे अवैधरीत्या कापण्यात आलीत. हे काम दुसऱ्या तिसऱ्या कुणीही केले नसून कंत्राटदारानेच केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्यान विकासाच्या नावावर या बगिच्यातील तीन झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. साबू ले-आउटमध्ये राहणारे चाकुले आणि विजय खोडके यांनी ही झाडे कापल्याची तक्रार आयुक्तांना दिली. त्यावर ही तक्रार बैठकीत ठेवून चौकशी अहवाल द्या आणि कायदेशीर तरतूद तपासून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात कंत्राटदार समीर देशमुख यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर यांनी 'लोकमत'ला दिली. कंत्राटदार समीर देशमुख याचेकडून नोटीसचे उत्तर आल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये दंड किंवा फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. शहरात अनेक ठिकाणी उद्यान विकासाची कामे सुरू असून सत्ताधिशांच्या जवळ असलेल्यांनी ही कामे घेतली आहेत. त्यामुळे या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे विजय खोडके नामक व्यक्ती हा बागवान असून सबकॉन्ट्रॅक्टरही आहे. त्यानेच ही वृक्ष कत्तल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. असे असते वृक्ष प्राधिकरणशहरातील कोणतेही झाड तोडायचे असल्यास अथवा त्याची फांदी छाटायची असल्यास वृक्षप्राधिकरणाची मान्यता लागते. या प्राधिकरणाची बैठक ४५ दिवसांत एकदा घेतली जाते. त्यात आलेल्या अर्जावर विचार केला जातो. झाड तोडायला कोणताही पर्यायच नसेल तरच परवानगी दिली जाते. त्यासाठी समिती प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करते. एका बैठकीत ७५ ते ८० अर्ज येतात. पर्यावरण क्षेत्रात काम करणारे तीन सदस्य, वनविभागाचे अधिकारी, महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी आणि शहर अभियंता या समितीचे सदस्य असतात. आयुक्तांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.झाडे तोडण्यासाठी टोळी सक्रियशहरातील झाडे तोडण्यासाठी ठेकेदारांची एक टोळीच कार्यरत आहे. नियम धाब्यावर बसवून या टोळीकडून झाडांची बिनबोभाटपणे कत्तल केली जाते. महापालिकेच्या उद्यान विभागातील काही महाभागांचे या टोळीला सहकार्य असते. त्यामुळे झाड तोडायचे आहे, अशी माहिती मिळाल्याबरोबर या टोळीतील सदस्य जागे होतात. या गोरखधंद्याला राजकीय वरदहस्तही लाभला आहे. सत्ताधिशांच्याजवळ असल्याचा फायदा घेतला जात असल्याच्या आरोपाला आजच्या प्रकारामुळे बळ मिळाले आहे.