शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उपाशी पोट अन् अनवाणी पायाने केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला.

ठळक मुद्देआदिवासींची वाताहत : शेकडो किलोमीटरची पायपीट; अधिकाऱ्यांची समयसूचकता

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दुपारी दीड वाजताची वेळ. अंगाची लाहीलाही करणारे उन्ह. तीन चिमुकल्यांच्या हातात चार केळी, दोन रुपयांचा बिस्किट पुडा. ११ जणांसाठी पाण्याची एकमेव बॉटल. सर्वांच्या डोक्यावर भांड्याकुंड्याचे ओझे. शंभर किलोमीटरचा प्रवास करीत उपाशीपोटी गावाकडे निघालेल्या या आदिवासींना पाहून अधिकाऱ्यांची गाडी थांबली. विचारणा झाली. नजीकच्या झाडाखाली सावलीत बसवून त्यांना पाणी पुरविले गेले. डॉक्टरांना पाचारण करून तपासणीदेखील झाली. पोटभर जेवणाची व्यवस्था केल्यावर त्यांना शासकीय वाहनाने गावापर्यंत पोहचविले गेले. मेळघाटातील सोनापूर-एकझिरा रस्त्यावर शनिवारी हे दिलासादायक चित्र अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेने निदर्शनास आले.पोटासाठी शेकडो किलोमीटर गेलेले आदिवासी पाठीवर बिऱ्हाड घेऊन जंगलाच्या आडमार्गाने पायपीट करीत परत येत आहेत. शिक्षितांना घरी पोहचविण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली जाते. मात्र, आदिवासींसाठी काय, हा प्रश्न कोरोनाच्या संकटकाळातही कायम आहे. २३ मार्च रोजी देश लॉकडाऊन झाला. त्यावेळी जो जिथे होता, तिथेच अडकून पडला. मेळघाटातूनही हजारो आदिवासी कामाच्या शोधात परराज्यासह राज्यातील बड्या शहरांमध्ये कामासाठी गेले होते. परंतु, दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी अडकल्याने गावाकडे जाण्याची ओढ लागली. जवळचे कमावलेले धन होते, ते सर्व संपले. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करीत आदिवासी चिल्यापाल्यांसह गाव जवळ करीत आहेत. दर्यापूर येथे कामाला आलेले ११ आदिवासी तीन चिमुकल्यांसह धारणी तालुक्यातील कसाईखेडा येथे जाण्यासाठी पायी निघाले होते. त्या रस्त्याने चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व कर्मचारी पाणीटंचाई व टँकरचा आढावा घेण्यासाठी जात असताना हा समूह त्यांच्या दृष्टीस पडला.आरोग्य तपासणीधारणी तालुक्यातील कसाईखेडा येथील ते आदिवासी दर्यापूर येथे दाल मिलमध्ये कामासाठी गेले होते आणि तिथून ते पायी गावाकडे निघाले होते. त्या आदिवासींसाठी नजीकच्या टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वाहन बोलवून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना भोजन देण्यात आले. धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याशी संवाद साधून कसाईखेडा येथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली.शनिवारी पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी जात असताना काही आदिवासी पायी जाताना दिसले. त्यांची विचारपूस करून आरोग्य तपासणी व जेवण देऊन त्यांना शासकीय वाहनाने गावी पाठविण्यात आले.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या