शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

राजस्थानातील ‘त्या’ मजुरांची कंटेनरमधून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ठळक मुद्देआरोग्य तपासणी : शिरखेड पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : राजस्थानातू महाराष्ट्रात लाकडी फर्निचरचे काम करण्याकरिता आलेल्या ८० कारागिरांना राजस्थानला परत घेऊन जाणारा एक मोठा ट्रक मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार, २७ मार्चला सायंकाळी पकडण्यात आला. सदर वाहनातील सर्व लोकांना कोरोना तपासणीकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीअंती पुढील निर्णय घेऊन शिरखेडमधून आणले गेले. या ८० मजुरांमध्ये ५ महिला ४ लहान मुलांचीही तपासणी करून शासकीय वसतिगृहात पाठविले. वसतिगृहात राहण्याची सोय तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानुसार केली आहे.या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीदेखील सदर मजूर आपल्या गावी जाण्याचा हट्ट सोडत नसल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार राजस्थान वरून मोठ्या प्रमाणात लाकडी कोरीव काम करणारे हे कारागीर महाराष्ट्रात सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वत्र 'लॉकडाऊन' केल्यामुळे सदर कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ८० कामगार राजस्थानकडे परत जात असताना शिरखेड पोलिसांना आढळून आले. त्यांनी ट्रक क्रमांक आरजे १९ जीएफ ४५०२ हा टाटा कंपनीचा ४०१८ मॉडेलचा ट्रक अडवून त्यांची चौकशी केली असता, ट्रकचा चालक-मालक पताराम केसाराम चौधरी (रा. शेरगड जि. जोधपूर राजस्थान) याने दिलेल्या माहितीवरून, ओरिसा ते महाराष्ट्र दरम्यान विखुरलेल्या समस्त कारागिरांना तो आपल्या गावी राजस्थानात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. सदर वाहन ओडिशावरून राजस्थानातील सर्व मजुरांना घेऊन नागपूर येथे पोहचला. तेथून अमरावती येथील ४० ते ४५ लोकांना घेऊन राजस्थानच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु शिरखेड पोलिसांनी तो अडवून 'डिटेन' केला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.