शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता बदल्या होणार आॅनलाईन! सामान्य प्रशासन विभागाचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:11 IST

अमरावती - ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी राबविलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदलीसाठी येत्या एप्रिल, मे मध्ये आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. बदलीसाठी १० जागांचा पसंतीक्रम द्यावा लागणार असून, त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी बदली झाल्यास तेथे रुजू व्हावे लागणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी व परिसरात वर्षानुवर्षे राहणा-या तसेच राजकीय हस्तक्षेपाने ...

अमरावती - ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी राबविलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदलीसाठी येत्या एप्रिल, मे मध्ये आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. बदलीसाठी १० जागांचा पसंतीक्रम द्यावा लागणार असून, त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी बदली झाल्यास तेथे रुजू व्हावे लागणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी व परिसरात वर्षानुवर्षे राहणा-या तसेच राजकीय हस्तक्षेपाने मोक्याच्या ठिकाणी बसणा-या अधिका-यांना आता बसणार आहे. शिक्षकांनी आपल्या पसंतीच्या १० जागा दिल्यानंतर त्यांच्या समुपदेशाने या जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीच्या या धोरणाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले असून याच धर्तीवर विविध विभागांनाही हे धोरण लागू करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यानुसार येत्या एप्रिल, मे महिन्यात नव्या धोरणानुसार भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली.या बदली प्रक्रियेत बदलीस पात्र अधिकारी व कर्मचा-यांची यादी तसेच रिक्त होणाºया जागांची यादी जाहीर केली जाईल. संबंधितांना आपल्याला हव्या असलेल्या बदलीच्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम द्यावा. त्यानंतर त्याने यापूर्वी कोठे काम केले त्याची गुणवत्ता, आवड आणि उपयोगिता तपासून बदली करण्यात येईल. त्यामुळे बदलीच्या धोरणात सुसूत्रता येणार आहे. या नव्या धोरणामुळे एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या प्रकारांना आळा बसणार असून, सर्व अधिकाºयांना समान संधी मिळणार आहे.

टॅग्स :TransferबदलीGovernmentसरकार