शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2023 17:28 IST

महसूल व वन मंत्रालयाचे आदेश, मुख्यालयातील समकक्ष अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवृून बदली ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश

अमरावती : भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबतचे आदेश राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने मंगळवारी जारी केले आहे. एकूण १२ वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना बदलीने पदोन्नती आणि पदस्थापना देण्यात आली आहे. यात ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एस.व्ही. रामाराव यांनी मुंबई येथे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. ठाणे येथील वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) के. प्रदीपा यांना ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक़ (प्रादेशिक) येेथे रिक्त पदी पदोन्नती मिळाली आहे.

अमरावतीचे वनसंरक्षक जी.के. अनारसे यांना मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती, उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांना ठाणे (कार्य आयोजना), यवतमाळचे उपवनसंरक्षक आनंद रेड्डी येल्लु यांची नागपूर, सहायक वनसंरक्षक एन. जयकुमारन यांची अकोट (वन्यजीव) येथे उप वनसंरक्षक म्हणून पदस्थापना, गडचिरोली वन विभाग अंतर्गत धानोरा येथील सहायक वनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांची यावल (प्रादेशिक) उप वनसंरक्षक, पांढरकवडा येथील सहायक वनसंरक्षक अग्रीम सैनी यांची नाशिक येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकपदी, सहायक वनसंरक्षक भुक्या नरसिंम्हा स्वामी हे भंडारा येथील महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, वडसा येथील सहायक वनसंरक्षक धनंजय कुंडलिक यांची यवतमाळ (प्रादेशिक) येथे उप वनसंरक्षकपदी, वाशिम येथील सहायक वनसंरक्षक शैलेश मिना यांची गडचिरोली येथील उपवनसंरक्षक तर, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक अभिजीत वायकोस यांची वाशिम येथे उपवनसंरक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आहे. बदली, पदोन्नती वा पदस्थापनेच्या जागी आदेशानंतर त्वरेने रूजू व्हावे, असे आदेश मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) मल्लीकार्जुन जी. यांच्यास्वाक्षरीने निर्गमित झाले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागTransferबदली