शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

राज्यात ५० वित्त लेखाधिका-यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:35 IST

महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणा-या ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला.

अमरावती - महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणाºया ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला.

पुणे येथील महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे लेखाधिकारी संजीव शिरस ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना त्याच जागी मुदतवाढ देण्यात आली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील वरिष्ठ लेखाधिकारी महादेव टेळे यांची बेलापूरच्या मजीप्रात समकक्ष पदावर, भंडारा येथील जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांची चंद्रपूर येथील स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी, अकोला येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक जनार्दन खोटरे यांची मुंबई शहर व्हर्च्युअल ट्रेझरी सहायक संचालकपदी, ठाणे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांची पनवेल महापालिकेत मुख्य लेखाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त कार्यालय (अमरावती)) चे सहायक संचालक किशोर गुल्हाने यांची नागपूर येथील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात, कोल्हापूर येथील जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांची कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिवपदी, कोल्हापूर स्थानिक निधी लेखा कार्यालयाचे सहायक संचालक धनाजी शिंदे यांची सातारा कोषागार अधिकारी, बीड येथील स्थानिक निधी लेखापरीक्षण सहायक संचालक शिरीषकुमार धनवे यांची सोलापूर महापालिकेत मुख्य लेखाधिकारीपदी, पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या सहायक संचालक सुचिता साकोरे यांची पुणे येथील महिला बालविकास आयुक्तालयात बदली झाली. नवी मुंबई ठाणे येथील निधी लेखापरीक्षा संचालनालयाचे सहायक संचालक दत्तदास कराळकर यांची बांद्रा येथील सहायक अधिदान व लेखाधिकारीपदी, भंडारा येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक मनीषा शेंडे यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी महेशकुमार कारंडे यांची कोल्हापूर कोषागार अधिकारीपदी, नाशिक येथील जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी देवराव म्हस्के यांची नाशिक येथील लेखा व कोषागार सहसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालकपदी, चंद्रपूर येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक नागसेन बागडे यांची नागपूर येथील लेखा व कोषागारे सहसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालकपदी, नांदेड येथील जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी राधाकिसन राऊत यांची लातूर येथील कोषागार अधिकारीपदी, नागपूर येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक योगेश जाधव यांची गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी राजू लाकूडझोडे यांची रत्नागिरी स्थानिक लेखापरीक्षा सहायक संचालकपदी, औरंगाबाद येथील सहायक संचालक राजेश माने यांची औरंगाबाद महापालिका लेखापरीक्षण उपविभाग-३ येथील सहायक संचालकपदी, मुंबई शहर राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे सहायक संचालक सुजित देवकर यांची पालघर कोषागर अधिकारीपदी, अमरावती विभागीय आयुक्तालयातील सहायक संचालक प्रकाश दासे यांची अमरावती विभागीय समाजकल्याण कार्यालयात लेखाधिकारी वर्ग-१ पदी, नागपूर जिल्हा परिषदेचे सहायक संचालक अमित अहिरे यांची गडचिरोली कोषागार अधिकारीपदी, अमरावती विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे सहायक संचालक योगेश क्षीरसागर यांची यवतमाळ स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी, बांद्रा येथील सहायक अधिदान व लेखाधिकारी सुनील मोरे यांची ठाण्याच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाच्या सहायक संचालकपदी, मुंबई शहर ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सहायक संचालक विजयकुमार कलवले यांची मंत्रालयातील नियोजन विभागात लेखाधिकारीपदी, तर पालघर येथील जिल्हा कोषागार अधिकारी विकास खोळपे यांची रायगड जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बदली झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी विजय देशमुख यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात लेखा (ताळमेळ) सहायक संचालकपदी, ठाणे येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाचे वित्त अधिकारी मोतीराम रॉड्रिक्स यांची नवी मुंबई सहायक संचालकपदी कोकण विभाग, लातूर येथील कोषागार कार्यालयाचे सहायक संचालक सचिव कवठे यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, नागपूर रेशीम संचालनालयाचे लेखाधिकारी सीमा नन्होरे यांची नागपूर येथील स्थानिक निधी लेखा संचालनालयात सहायक संचालकपदी, जालना येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक सचिन धस यांची औरंगाबाद सहायक संचालक (प्रशिक्षण), नागपूर येथील स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे सहायक संचालक प्रशांत वावगे यांची नागपूर येथे स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी, पुणे विभागीय आयुक्तालयाचे सहायक संचालक भाग्यश्री पवार यांची पुणे कृषी आयुक्तालयात सहायक संचालकपदी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव राजश्री पाटील यांची सातारा जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, नागपूर विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक कार्यालयातील सहायक संचालक शुभदा चिंचोळकर यांची नागपूर येथील रेशीम संचालनालयात लेखाधिकारीपदी, नवी मुंबई रायगड महापालिका लेखापरीक्षण कार्यालयातील सहसंचालक अभिजित पिसाळ यांची मुंबई वरळीच्या नगरपरिषद संचालनालयात लेखापरीक्षा अधिकारीपदी, मंत्रालयातील महसूल व वन विभागात भूकंप पुनर्वसन कक्षातील सहायक संचालक सारिका नन्नावरे यांची मुंबई लेखा व कोषागारे संचालनालयात संचालकपदी, नाशिक येथील लेखा कोषागारे सहायक संचालक (प्रशासन) स्वरांजली पिंगळे यांची नाशिक जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखाधिकारीपदी, सातारा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण यांची मुंबई महाराष्टÑ पोलीस महासंचालनालयात सहायक संचालकपदी, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद खोत यांची सिंधुदुर्ग कोषागार अधिकारीपदी,  गोंदिया स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक रमेश कुमारे यांची नागपूर विभागीय समाजकल्याण कार्यालयात सहायक संचालकपदी, नागपूर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सहायक संचालक शंकर बळी यांची यवतमाळ जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, तर रत्नागिरी स्थानिक निधी लेखापरिक्षा सहायक संचालक विशाल गाडे यांची नवी मुंबई जीवन प्राधिकरणात वरिष्ठ लेखाधिकारीपदी बदली झाली आहे. सिंधुदुर्ग येथील जिल्हा कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांची मुंबईच्या लेखा कोषागार संचालनालयात सहायक संचालकपदी, सिंधुदुर्ग येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक मानसिंह पाटील यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखाधिकारीपदी, बांद्रा अधिदान व लेखाधिकारी प्रगती धनावडे यांची मुंबई येथील कोषागार व इतर तांत्रिक बाबी संचालनालयात सहायक संचालकपदी, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे लेखाधिकारी पंकज गिरी यांची पुणे विभागीय आयुक्तालयात सहायक संचालकपदी, पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार जावीर यांची तेथील महाराष्टÑ कृष्णा खोरे विकास महामंडळात वरिष्ठ लेखाधिकारीपदी, पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे सहायक संचालक मारुती मुळे यांची पुणे येथील विभागीय समाजकल्याण सहायक संचालकपदी, तर पुणे येथील विद्या प्राधिकरणाचे सहायक संचालक बाळासाहेब पाटील यांची मुंबईच्या वरळी येथील दुग्धविकास आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाºयांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत निर्देश आहेत. लेखाधिकाºयांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील एचआरएमएसमधील नमुन्यात भरून नवीन कार्यालय प्रमुखामार्फत संचालनालयास सादर करावे, असे वित्त विभागाचे अवर सचिव मा. रा. गांधी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारTransferबदली