शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आठ आयएफएस अधिका-यांच्या बदल्या; सुनील लिमये, दिलीप सिंग यांना बढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 17:05 IST

भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे.राज्याच्या महसूल व वने विभागाने बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार आठ आयएफएस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) दिलीप सिंग यांची नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्तीने बढती दिली आहे. ठाणे येथे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची नागपूर येथे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) पदी बढती देण्यात आली आहे. धुळे येथे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आर. एस. कदम यांची ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे येथील मुख्य वनसंरक्षक (संशोधन) टी.एन. साळुंखे यांची धुळे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पनवेल येथील उपवनसंरक्षक (भूमी अभिलेख) एन.बी. गुदगे हे औरंगाबाद येथे सामाजिक वनीकरणात वनसंरक्षकपदी, धुळे येथील उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात उपसंचालकपदी, दीर्घकालीन रजेवर असलेले राकेश सेपट यांची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) तर रोहा येथील उपवनसंरक्षक (प्रादेशिक) विजय सुर्यवंशी यांची नाशिक येथे सामाजिक वनीकरणाच्या उपवनसंरक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

नवख्या आयएफएसची बदलीसाठी अशीही फिल्डिंग        राज्याच्या वनविभागात आठ आयएफएस अधिका-यांच्या बदल्या, बढती प्रक्रिया पार पडली असली तरी सन २०१४ चे आयएफएस अधिकारी राकेश सेपट यांच्या बदलीबाबत चर्चा रंगू लागली आहे. सेपट यांचे आयएफएसचे प्रशिक्षण पूर्ण होताच पहिली पोस्टींग ही पूर्व मेळघाटात देण्यात आली होती. पहिल्या पोस्टींगवर नियुक्त होणे क्रमप्राप्त असताना राकेश सेपट हे रूजू न होता दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर बराच काळ ते मलईदार पदाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मलईदार खुर्ची खाली होताच सेपट यांनी बदली करुन घेतली. मात्र, पूर्व मेळघाटात रूजू न झाल्याबद्दल सेपट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सौजन्य सुद्धा वनखात्याने दाखविले नाही. सेपट यांना बदलीसाठी वनमंत्रालयातून भरीव सहकार्य देखील मिळाले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती