खांदेपालट : गैरआदिवासी भागातून आठ जणांची मेळघाट वारीअमरावती : जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम जोरात सुरू आहे. १० मे रोजी महिला व बालकल्याण विभागातील बदल्याचा कार्यक्रम निश्चित केला होता. मात्र ही बदल्यांची प्रक्रिया शनिवारी जिल्हा परिषदेत राबविण्यात आली. यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या १४ तालुक्यांतील १८ अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या बदल्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आल्या आहेत.या बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात १४ मे रोजी महिला व बालकल्याण विभागाने ८ अंगणवाडी पर्यवेक्षिकांची प्रशासकीय कारणावरून आणि चार कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे या बदल्यांमध्ये मेळघाटमध्ये कार्यरत पाच अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मेळघातून गैरआदिवासी भागात बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. गैरआदिवासी भागातील आठ अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मेळघाटात बदलीवर पाठविण्यात आले आहे. वभागाने विस्तार अधिकारी, श्रेणी दोन आणि श्रेणी तीन मधील चार बदल्या केल्या आहेत. ही प्रक्रिया समुपदेशनाव्दारे शनिवारी सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कैलास घोडके आदींच्या उपस्थित पार पडली.
अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे स्थानांतरण
By admin | Updated: May 16, 2016 00:02 IST