शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

कौशल्य विकासात मातंग समाजाला प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:25 IST

सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मातंग समाजाच्या उत्थानाकरिता विविध योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला १० बकऱ्या मोफत देऊ. मुस्लिम समाजाकरिता वरूड येथे एक कोटीतून शादीखाना, मुला-मुलींचे वसतिगृह, तालुक्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तिघांना पुरस्कार तसेच कौशल्य विकासमध्ये बँडवादक आणि चर्मकाराकरिता प्रशिक्षण आदी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल्या.

ठळक मुद्देदिलीप कांबळे : मुस्लीम समाजाकरिता एक कोटीचा शादीखाना, वरूड येथे घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मातंग समाजाच्या उत्थानाकरिता विविध योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला १० बकऱ्या मोफत देऊ. मुस्लिम समाजाकरिता वरूड येथे एक कोटीतून शादीखाना, मुला-मुलींचे वसतिगृह, तालुक्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तिघांना पुरस्कार तसेच कौशल्य विकासमध्ये बँडवादक आणि चर्मकाराकरिता प्रशिक्षण आदी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल्या. स्थानिक राजुरानाका परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण शनिवारी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना स्वयंचलित वाहने वितरित करण्यात आल्यात.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल बोंडे होते. त्रिवेणी सूतगिरणीच्या अध्यक्ष वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे, उपाध्यक्ष हरीश कानुगो, माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, बांधकाम सभापती शुभांगी खासबागे, नगरसेविका हर्षदा रक्षे, शालिनी चोबितकर, माया वानखडे, पं.स. सदस्य अंजली तुमडाम, भाजप सरचिटणीस रविराज देशमुख, बाळासाहेब खंडारकर, राम जोशी, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, समाजकल्याण आयुक्त चेतन जाधव, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, तहसीलदार आशिष बिजवल, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, जगदीश वानखडे, गजू ढोके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सात दिव्यांगांना जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्यावतीने स्वयंचलित वाहनाचे ना. कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कंत्राटदार गोपाल चिमोटे यांचा ना. कांबळे हस्ते सत्कार करण्यात आला.आ. अनिल बोंडे यांनी संजय गांधी निराधार योजनेतील २५ वर्षे वयाची अट शिथिल करावी, श्रावणबाळ योजनेची अट ६० वर्षे करावी तसेच अनुसूचित जातीकरिता स्वतंत्र वस्तीगृह, हिंदू दलित समाजाला तीन टक्के आरक्षण, मुस्लिम समाजाकरिता शादीखाना मंजूर करण्याची मागणी केली.नगराध्यक्ष स्वाती आंडे आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन राजकुमार राऊत व आभार प्रदर्शन शुभांगी खासबागे यांनी केले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.