शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विदर्भातील निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रबोधनीत क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 18:12 IST

निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह अ‍ॅन्ड डेव्हलोपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले गेले.

ठळक मुद्देआगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे.निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.औरंगाबाद येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके हे येथे प्रशिक्षक होते.

अमरावती - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले गेले.

प्रशिक्षणात उमेदवारांना पहिल्या दिवशी उमेदवार पात्र व अपात्र, पोष्टल बॅलेट आणि इटीपीबीएस, आयटी अ‍ॅप्लिकेशन सुविधा, सुगम, समाधान, सी-व्हिगील, दुसऱ्या दिवशी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, एक्सपेंडीचर मॉनिटरींग, नॉमिनेशन बाय कँडीडेट, स्क्युटिनी बाय नॉमिनेशन, तिसऱ्या दिवशी डीइएमपी अ‍ॅन्ड कॉन्सिट्युएन्सी प्लॅन, व्हूलनेराबिलिटी मॅपिंग, विड्रॉल ऑफ कँडीडेट, अलॉटमेंट ऑफ सिंबॉल, काऊंटींग, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, इव्हीएम, व्हीव्हीपॅट, पोल डे अरेंजमेंट आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.

अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर, चांदूर रेल्वे व मोर्शी या विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश होता. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड, वणी, राळेगाव व आर्णी, वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व आर्वी, गोंदिया जिल्ह्यातील गॅमदिया, देवरी, तिरोडा व अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील भंडारा व तुमसर, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, देसाईगंज या विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके हे येथे प्रशिक्षक होते. दरम्यान सहाय्यक निवडणूक अधिकारी हे उपविभागीय अधिकारी असल्याने या चार दिवसांच्या अवधीसाठी त्यांचा पदभार संबंधित तहसीलदारांना देण्यात आलेला आहे. औरंगाबाद व पुणे येथेही चार दिवसांचे प्रशिक्षण 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ६४ अधिकाऱ्यांना दोन बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिले गेले. ११ ते १४ या कालावधीत वॉटर अ‍ॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट, औरंगाबाद येथे १०१ अधिकाऱ्यांना तीन बॅचेसमध्ये, तर पुणे येथील बीएसएनएल रिजनल ट्रेनिंग सेंटरमध्ये १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान १३७ अधिकाऱ्यांना तीन बॅचेसमध्ये निवडणूकविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAmravatiअमरावती