शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता वाहतूक सुरक्षेचे मुलांना शिक्षण द्या

By admin | Updated: January 12, 2016 00:10 IST

रस्ता सुरक्षा ही पोलीस, समाज, पालक व पाल्यांची जबाबदारी आहे. वाहन वेगाने व घाईत चालविल्यामुळे बहुतांश अपघात होतात.

पालकमंत्री पोटे : रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियानाचे उद्घाटनअमरावती : रस्ता सुरक्षा ही पोलीस, समाज, पालक व पाल्यांची जबाबदारी आहे. वाहन वेगाने व घाईत चालविल्यामुळे बहुतांश अपघात होतात. वेग नियंत्रणात ठेऊन वाहन चालविल्यास अपघात कमी होतील. अपघात कमी करण्यासाठी तसेच समाजात जागरुकता आणण्यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे आणि रस्ता सुरक्षेचे प्रात्यक्षिक वर्षभर सुरु ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केल्या.येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित २७ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियानचे उदघाटन ना. पोटे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून आ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवास्कर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे उपस्थित होते. वाहन परवाने देताना कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी व्हावी, तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करावी, कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्वांनी कामे करावीत, असेही ना. पोटे म्हणाले. यावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात दिनदर्शिका, पुस्तिका, पॉम्पलेटचे विमोचन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. बोंडे म्हणाले, उमेदवारांची बौध्दिक व मानसिक स्थिती पाहावी. शालेय विद्यार्थ्यांना जबाबदारी देऊन वर्षभर मोहीम राबवावी. मागील वर्षी ४ लाख ९० हजार लोक अपघातात जखमी झालेत. त्यापैकी एक लाख २४ हजार लोकांचा मृत्यू झाला. या अपघातातील ५२ टक्के लोक १८ ते २९ वर्षे वयोगटातील होते. एकू ण अपघातात १६ टक्के दोष वाहन चालकांचा आहे. नवीन वाहने खरेदी करण्यापूर्वी ती चालविण्यासंदर्भात संपूर्ण माहिती व तंत्रज्ञान वाहन चालकांना द्यावे, डिलर व विक्रेत्यांचीही रस्ते सुरक्षा सप्ताहात मदत घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिली. मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलकांव्दारे रस्ते वाहतूक नियमांची माहिती द्यावी, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी बेदरकारपणे वाहने चालवतात त्यांना समुपदेशन करावे, असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती तोटेवार व आभार प्रदर्शन मार्तंड नेवासकर यांनी केले.