शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळ’च्या वाहनातून सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:45 IST

पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत बिहालीसह लगतच्या जंगलातून होणाऱ्या सागवान तस्करीत वाहनाचा क्रमांक बदलवून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चिन्हाचा वापर वनतस्कर करीत आहेत. भाजपच्या ‘कमळ’वर सागवान तस्करी करीत असलेले एक वाहन वनअधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

ठळक मुद्देवाहनक्रमांक बनावट : मूळ क्रमांकाची चारचाकी बैतुलात

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत बिहालीसह लगतच्या जंगलातून होणाऱ्या सागवान तस्करीत वाहनाचा क्रमांक बदलवून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चिन्हाचा वापर वनतस्कर करीत आहेत. भाजपच्या ‘कमळ’वर सागवान तस्करी करीत असलेले एक वाहन वनअधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या वाहनाचा वापर गोमांस तस्करीतही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.सिनेस्टाईल पाठलाग करून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी अचलपूर शहरातील देवडी परिसरात एमपी ४८ सी २९७१ क्रमांकाचे वाहन सागवान चरपटांसह पकडले. या वाहनावर मागील बाजूस भाजपचे ‘कमळ’ अंकित आहे. पंचनाम्यादरम्यान हे वाहन सागवान तस्करीसह गोमांस तस्करीतही वापरले गेल्याचे वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पकडलेल्या वाहनाची माहिती बैतूल आरटीओकडून घेण्यात आली. बैतूल येथील रामबाबू मंडल यांच्या नावे हे वाहन निघाले. रामबाबू मंडल (रा. बैतूल) यांना वनअधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तेव्हा त्यांची एमपी ४८ सी २९७१ क्रमांकाची चारचाकी त्यांच्या घरीच उभी होती. त्यांनी व्हिडीओ कॉलिंगवरून घरासमोर उभी असलेले वाहन वनअधिकाऱ्यांना दाखविले.स्टॅम्प पेपरचा आधारपरतवाडा : चेसीस क्रमांक एमए१वायए२जेएचकेडी२डी४२४९६ हा वनअधिकाºयांनी अमरावती आरटीओकडे पाठवला. यावरून गाडीचा खरा नंबर एमएच २७ अ‍ेआर ६२२३ आणि मालक अभिजित पवार (रा. अमरावती) असल्याची माहिती पुढे आली. प्राप्त माहितीवरून वाहनाचे नंबर बदलवून वनतस्करी होत असल्याचे वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.यात वन अधिकाऱ्यांनी अभिजित पवार यांना नोटीस बजावली. ब्राम्हणवाडा थडी येथील अरशोद्दीन हसनोद्दीन इनामदार यांना २०१६ मध्येच वाहन विकले. जप्त केलेले वाहन माझीच आहे किंवा नाही, हे मला सांगता येणार नाही, असे विक्रीचा स्टॅम्प पेपर समोर करीत अभिजित पवार यांनी वनअधिकाऱ्यांपुढे त्यांनी स्पष्ट केले.स्टॅम्प पेपरवरून वनअधिकाऱ्यांनी अरशोद्दीनला नोटीस बजावली आहे. पण, अजूनपर्यंत अरशोद्दीन वनअधिकाऱ्यांपुढे हजर झालेला नाही. वनअधिकारी अरशोद्दीनच्या प्रतीक्षेत आहेत.वनविभाग या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आणखी कोणती नाट्यमय घडामोड पुढे येईल, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.चालक अटकेत, मालक फरारक्रमांक बदलवून वाहनातून सागवान तस्करीप्रकरणी चालकास वनअधिकाऱ्यांनी अटक केली. पण, वाहनमालक अद्यापही मोकाट आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चार्जशिट दाखल करून प्रकरण न्यायालयापुढे ठेवण्यात आलेले नाही. पकडलेले वाहन सरकार जमाही झालेले नाही.गोमांस तस्करीवनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या वाहनाच्या मागील बाजूस ‘कमळ’ आहे. त्यावर ‘भाजप’ असे लिहिले आहे. गोमांसाच्या वाहतुकीकरिता या वाहनाचा २०१६ पासून अनेकदा वापर झाल्याची शंका वनअधिकाऱ्यांना आहे. अवैध सागवानसह वाहन जप्त केल्यानंतर जनावरांच्या मांसाची दुर्गंधी येत होती. कित्येक दिवस ही दुर्गंधी कायम होती. हे वाहन अवैध सागवान चरपटांसह वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या निवासस्थानासमोरील आवारात उभे आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी