शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

वाहतूक पोलीस म्हणतात, लोकमत आॅफिसमध्ये जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:05 IST

रेल्वे स्टेशन मार्गावर ‘नो पार्किंग’ झोनमध्ये बेशिस्त वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

फुटपाथ झाले गडप : नियमांचे उल्लघंन करणारी वाहने उचललीअमरावती : रेल्वे स्टेशन मार्गावर ‘नो पार्किंग’ झोनमध्ये बेशिस्त वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच वाहतूक पोलिसांनी सोमवारी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. यासंदर्भात संबंधितांनी पोलिसांना विचारणा केली असता पोलीस आपले कर्तव्य विसरून 'लोकमत'मध्ये बातमी आली म्हणून कारवाई करावी लागत आहे. तुम्ही ''लोकमत'मध्ये विचारणा करण्यास जा'' असा बेजाबदारपणाचा मोफत सल्ला खुद्द वाहतूक पोलीसच फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांना देत आहेत. इर्विन चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चातून लोकांना सुरक्षित चालता यावे, यासाठी फुटपाथ तयार केले. परंतु अनेक किरकोळ व्यावसायिकांनी या फुटपाथवर दुकाने थाटून अवघे फुटपाथ गडप केली आहे. व या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून राजोरसपणे व्यवसाय थाटला आहे. असे संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी फुटपावरच व्यवसाय करण्यात येतात. यासंदर्भात संपूर्ण शहरातील अतिक्रमण, नॉ पार्किग व फुटपाथ कसे गडप केले, यासंदर्भाचे वृत्त व्हॉईस आॅफ लोकमत या सदरातून लोकदरबारात मांडले. त्यामुळे पोलिसांनी व महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरभर कारवाई केली होती. आता पुन्हा नो पार्किंग झोनमध्ये बेशिस्तपणे वाहने लावली जात आहेत. व्यवसाय करणे गुन्हा नाही. परंतु कुठलीही शिस्त न ठेवता पूर्ण फुटपाथ गडप करण्याचा गौरखधंदा काही व्यासायिकांनी सुरू केला आहे. वृत्त प्रकाशित होताच गाडगेनगर शहर वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग झोनमध्ये असलेल्या दुचाकी उचलून नेल्यात. एका गॅरेजच्या संचालकाने विचारणा केली असता 'लोकमतमध्ये वृत्त झळकल्यामुळे आम्हाला नाईलाजाने कारवाई करावी लागत आहे. तुम्ही आता 'लोकमत'मध्येच जाऊन विचारणा करा असे, कार्यालयात आलेल्या एका गॅरेजच्याच संचालकाने खुद्द सांगितले. त्यामुळे सामान्य लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. ते जनतेचे रक्षकच असे बेजाबदारीने उत्तर देत असतील तर पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्या सेनेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गडप झालेल्या फुटपाथचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. पोलीस आयुक्तांनीच घ्यावा पुढाकारशहरातील लोकांच्या अनेक तक्रारीची दखल घेईन. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकहितार्थ वृत्त प्रकाशित करण्यात येते. परंतु गाडगेनगर वाहतूक शाखेचे काही पोलीस कारवाई करताना आपले कर्तव्य बजावणया ऐवजी आम्ही वृत्तपत्रात बातमी आली म्हणून कारवाई करीत आहो. बाकी आमचे काही म्हणणे नाही. आपण त्यांना विचारणा करा अशी भूमिका घेतात व ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर कार्यालयात जाण्याचा मोफत सल्लाही देतात. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक साहेब, तुम्हीच पुढाकार घेऊन अशा कर्तव्याचा विसर पडलेल्या वाहतूक पोलिसांना वठणीवर आणा, अशी अमरावतीकरांची मागणी आहे व शहरात वाढलेल्या बेशिस्त वाहनांचा प्रश्न निकाली काढा, अशी मागणी होत आहे. फळे विक्रेते, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण इर्विन रुग्णालयापासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या नालीवर एका फळे विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. येथे रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्यामुळे वळण घेताना वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालयाच्या श्वविच्छेदन केंद्राच्या कडेला एका थंड माठ विक्रेत्याने रस्त्यापर्यंत नालीवर व फुटपाथवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. फुटपाथ गडप केल्या आहेत. पुढे रेल्वे स्टेशनसमोर एका शो रुमचालकाने व गॅरेज, सलूनच्या व इतर व्यवसायिकांनी फुटपाथ गडप केले आहे. बिनधास्तपणे नागरिक कुठेही बेशिस्तीने वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.