लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुटुंबीयांसोबत नास्ता करण्यासाठी गेलेल्या एका वाहतूक पोलिसाने देशी कट्टा बाळगणाऱ्या तरुणांना हटकले. त्यापैकी एकाने देशी कट्टा घेऊन पळ काढला, तर दुसरा त्यांच्या हाती लागला. गोंडबाबा मंदिराजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनाक्रमानंतर राजापेठ पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीला अटक करून देशी कट्टा जप्त केला. मात्र, या घटनेची माहिती देताना राजापेठ पोलिसांना त्या वाहतूक पोलिसाचा विसरच पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कामगिरी कुणाची, श्रेय लाटतंय कोण, असा सवाल उपस्थित झाला होता.वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी शनिवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य पार पाडले. घरी गेल्यावर पत्नी व मुलाला घेऊन गोंडबाबा मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये नास्ता करायला गेले. त्यावेळी तेथील टेबलवर असलेल्या कॅरीबॅगमध्ये त्यांच्या पत्नीला एक देशी कट्टा दिसला. दरम्यानच ती कॅरीबॅग घेण्यासाठी दोन व्यक्ती हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी कॅरीबॅग उचलून काढता पाय घेतला. त्यावेळी कर्तव्यदक्ष असणारे संदीप राठोड टेबलावरून उठून त्या दोघांजवळ गेले. मी पोलीस आहे, असे सांगून पिशवीत काय नेत आहे, अशी विचारणा त्यांनी केली. दोघेही पळून जाण्याच्या बेतात असताना संदीपशी त्यांची झटापट झाली. त्यावेळी एकाने देशी कट्टासह घेऊन पळ काढला. तसेच संदीपने दुसऱ्याला लगेच पकडले. त्यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. काही वेळात राजापेठच्या डीबी पथकाने घटनास्थळ गाठून पकडलेल्या त्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांचे कर्तव्य काय आहे, त्यांनी आॅफ ड्युटीमध्येही आपले कर्तव्य बजवायला हवे, हे पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे हे कार्य गौरवास्पद आहे.सीपींकडून रिवार्डपोलीस शिपाई संदीप राठोड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले व अशोक लांडे घडलेली सर्व घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानीही जीवाची पर्वा न करता धाडस दाखविणाऱ्या आपल्या शिपायाचे कौतुक केले. त्यानंतर संदीप पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याकडे गेले. त्यांनी संदीपच्या धाडसी वृत्तीची दखल घेत पाठ थोपटली. कौतुक करून रिवार्ड जाहीर केला.मध्यरात्री अंकुरनगरातून आरोपीला अटकपोलीस शिपाई संदीप यांनी ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाची राजापेठ पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, तो पळून जाणाºया आरोपीला ओळखत नव्हता. केवळ मी त्याला लिफ्ट दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून एका संशयिताचे छायाचित्र त्या तरुणाला दाखविले. त्यावेळी देशी कट्टा घेऊन पसार झालेला शुभम पांडे असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी अंकुरनगरातून आरोपी शुभम रामनारायण पांडे (२७, रा. अंकुरनगर, कुंभारवाडा) याला मध्यरात्री १.२५ वाजता अटक केली. त्याच्याजवळचा देशी कट्टा जप्त केला, अशी माहिती पीआय किशोर सूर्यवंशी यांनी दिली.
देशी कट्टा बाळगणाऱ्यास वाहतूक पोलिसाने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST
वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी शनिवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य पार पाडले. घरी गेल्यावर पत्नी व मुलाला घेऊन गोंडबाबा मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये नास्ता करायला गेले. त्यावेळी तेथील टेबलवर असलेल्या कॅरीबॅगमध्ये त्यांच्या पत्नीला एक देशी कट्टा दिसला.
देशी कट्टा बाळगणाऱ्यास वाहतूक पोलिसाने पकडले
ठळक मुद्देगोंडबाबामंदिराजवळील घटना : कुटुंबीयासोबत असताना दाखविले धाडस