शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

प्रशांतनगर उद्यानात ट्रॅफिक पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:34 AM

प्रशांतनगर येथील बगिच्यामध्ये ट्रॅफिक पार्क निर्माण करता येईल का, या विषयावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देबैठक : ३.५० कोटींच्या डीपीआरवर मंथन

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रशांतनगर येथील बगिच्यामध्ये ट्रॅफिक पार्क निर्माण करता येईल का, या विषयावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यात मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, नगरसेवक प्रदीप हिवसे, नूतन भुजाडे, राधा कुरील जयश्री डहाके, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहा. आयुक्त सुनील पकडे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अभियंता सुहास चव्हाण, विजय राऊत, सल्लागार उन्नत भारत अभियान अर्चना बारब्दे, विद्युत इंगोले, श्रीकांत गिरी, गार्गी खडसे उपस्थित होते.शहरातील महत्त्वाच्या उद्यानापैकी एक असलेल्या प्रशांतनगर उद्यानात ट्रॅफिक पार्क तसेच इतरही काही गोष्टी करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी राही रिलेटर्स प्रा. लि.चे विजय राऊत यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी प्रशांतनगर येथील बगिच्यासाठी एक प्रस्ताव तयार केला. त्याचे शनिवारी प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी नगरसेवकांनी काही बदल सुचवून पुन्हा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून सर्व संमतीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. याठिकाणी ट्रॅफिक पार्क तयार करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम सर्वांना कळावेत, यासाठी ट्रॅफिक पार्क तयार करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील नागरिक त्याला भेट देतील, असे ट्रॅफिक पार्क येथे निर्माण होणार आहे. याठिकाणी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था राहील. सद्यस्थितीत कोणताही बदल न करता नव्याने काही गोष्टी या बगिच्यात करण्यात येतील. येथे फूड झोन तयार करणार आहे. या पार्कमध्ये इनडोअर व आऊटडोअर गेम्स तसेच किड्स गेम झोन निर्माण केल्या जाणार आहे. सोलर पॉवर प्लांटसुद्धा तयार केल्या जाऊ शकणार आहे. आॅडिटोरियम हॉलसुद्धा प्रस्तावित केला आहे. योगासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविल्यास स्थानिकांना फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीस मदत होणार आहे. हा प्रकल्प सविस्तर तयार करण्याची सूचना संबंधितांना दिली आहे.