शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

वरूडचा पारंपरिक पोळा उत्साहात

By admin | Updated: September 3, 2016 00:11 IST

येथील केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारा पारंपरिक पोळा गुरुवारी पार पडला.

वरूड : येथील केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारा पारंपरिक पोळा गुरुवारी पार पडला. तहसीलदार राम लंके यांच्या हस्ते तोरण तोडून पोळा फुटला. तोरणाखाली शेकडो बैलजोड्यांनी हजेरी लावली. वरूडमध्ये तीन पोळे भरतात. यामध्ये कडंूचे गोठाण आणि राजुरा नाका परिसरातील पोळ्याचा समावेश आहे. केदारेश्वर मंदिरात तोरण बांधण्याचा मान आंडे परिवाराला असल्याने या कुटुंबाकडून पोळ्याचे आयोजन केले जाते. तहसीलदार लंके यांच्या हस्ते तोरण तोडले गेले, तर कडूंचे गोठाण आणि राजुरानाका परिसरातील पोळ्यामध्येसुद्धा शेकडो जोड्या उपस्थित होत्या. बदलत्या काळात गोधनावर संकट उभे ठाकल्याने यांत्रिक शेती सुरू झाली आणि पर्यायाने बैलांची संख्या रोडावत चालली आहे. मात्र, पोळ्याची परंपरा शेकडो वर्षांनंतरही निरंतर सुरू आहे. यामुळे येथील ऐतिहासिक पोळ्याला अधिक महत्त्व आहे. या पोळ्यामध्ये शेकडोे शेतकरी आणि धुरकरी नवीन कपडे परिधान करून उपस्थित होते. आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, नीळंकठ आंडे, तहसीलदार आशिष बिजवल, केदारेश्वर संस्थानचे अनिल जावळे, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, ठाणेदार गोरख दिवे, एपीआय चित्तरंजन चांदुरे, शिंगाडे, पीएसआय प्रफुल्ल डाउले, संगीता गावंडे, दिलीप श्रीराव आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)