लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक श्रीकृष्णपेठ येथून चोरीस गेलेल्या ट्रकचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात शहर कोतवाली पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी मेळघाटातील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमएच ४६ एफ ०८९९ या क्रमांकाचा ट्रकटिप्पर जप्त करण्यात आला आहे. गोविंदा बापुराव बारवे (२७, डोगमबर्डा, ता.चिखलदारा)व गणेश राजणे (२१,धारणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. चालक आणि क्लिनरच चोर निघाल्याच्या या घटनेचा ठाणेदार मनीष ठाकरे यांनी प्रभावीपणे तपास केला.राठीनगर येथिल शासकीय कंत्राटदार दिलिप बाबाराव वाकोडे यांचे श्रीकृष्णपेठ येथे एक बांधकाम सुरु आहे. त्या कामासाठी ठेवलेला एमएच ४६ एफ ०८९९ ट्रकटिप्पर ४ ते ५ सप्टेबरच्या मध्यरात्री चोरीला गेल्याची तक्रार वाकोडे यांनी ५ सप्टेंबरला शहर कोतवाली पोलिसांमध्ये नोंदविली होती. पोलिसांनी तक्रारीवरून कलम ३८१ अन्वये गुन्हा नोंदवून चौकशी आरंभली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हालवत ट्रकचोरीचे कनेक्शन मेळघाटशी जुळले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एक पथक मेळघाटात पाठविले. ट्रकटिप्पर चोरीला गेल्यानंतर नुकतेच कामावर लागलेले चालक आणि क्लिनर कामावर नसल्याचे माहिती वाकोडे यांनी पोलिसांनी दिली. त्यावरून दोन्ही आरोपींचा मार्ग काढण्यात आला. चौकशीअंती आरोपी मुख्य आरोपी गोविंदा बापुराव बारवे (२७, डोगमबर्डा ,ता.चिखलदारा) याने चोरीचा तो ट्रक त्याच्या सासºयाच्या गावी गौलखेडा बाजार येथे लपवून ठेवल्याची माहिती समोर आली. हेडकान्स्टेबल अशोक पिंजरकर व कॉन्स्टेबल सुहास शेंडे यांनी तातडीने ६ सप्टेंबरला गौलखेडा बाजार गाठून चोरीचा ट्रक जप्त केला व गोविंदा बारवे या आरोपीसह गणेश राजणे (२१,धारणी) या क्लिनरला अटक केली.वाकोडे यांची तक्रार गांभीर्याने घेऊन तपासाची दिशा निश्चित केली. बांधकामावर नसलेल्या चालक व क्लिनरवर संशय आल्याने मेळघाट गाठले.मुख्य आरोपेसह दोघांना अटक करुन ट्रक जप्त करण्यात आला .मनिष ठाकरे, ठाणेदार कोतवाली.
२४ तासांत ट्रकचोरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:38 IST
स्थानिक श्रीकृष्णपेठ येथून चोरीस गेलेल्या ट्रकचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात शहर कोतवाली पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी मेळघाटातील दोन आरोपींना अटक केली आहे.
२४ तासांत ट्रकचोरीचा छडा
ठळक मुद्देशहर कोतवालीचे यश : दोन आरोपींना अटक