अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेशी आकाश गुलाबराव शेजव (२७, रा. राधिकानगर) याने फेसबूक मैत्रीवरून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर त्याने लग्नास नकार दिला. गुलाबराव शेजव, तायडे (रा. वडाळी) व एका महिलेने तिला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये सोमवारी गुन्हा नोंदविला. --------------
शवदाहिनीची तोडफोड, गुन्हा दाखल
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदू स्मशानभूमीसाठी आलेल्या विद्युत शवदाहिनीची तोडफोड केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ३१ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले. २८ मे रोजी ही घटना घडली. शिवराय कुळकर्णी, अजय सारस्कर, प्रणीत सोनी, पप्पू पाटील, संतोष बद्रे, चंद्रशेखर कुळकर्णी, धीरज तायडे, सचिन बावनेर, पवन लेंडे, अमर महाजन, नितेश शर्मा, हर्षल ठाकरे, अक्षय तराळे यांच्यासह ४० जणांचा यात समावेश आहे.
--------------------
तडीपार गुंडाचा शहरात प्रवेश
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलपुरा येथील कपिल रमेश भाटी (२१) या तडीपार गुंडाने शहरात विनापरवानगी प्रवेश घेतला. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. राजापेठ पोलिसांनी सोमवारी भादंविचे कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविला.