शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉप टू बॉटम सारेच ‘धनी’, मास्टरमाइंड महापालिकेबाहेरचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:15 IST

निविदेतील अटी-शर्ती आणि स्पेसिफिकेशननुसार वाहन उपलब्ध झाले नसतानाही संबंधित कंपनीचे देयक प्रस्तावित करणारे अधीक्षक भारतसिंह चौव्हाण यांनी फायर रेस्क्यू वाहनाच्या अनियमिततेत ‘की-रोल’ वठविल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देफायर रेस्क्यू वाहन : अधीक्षकांकडून लपवाछपवीचा खटाटोप

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निविदेतील अटी-शर्ती आणि स्पेसिफिकेशननुसार वाहन उपलब्ध झाले नसतानाही संबंधित कंपनीचे देयक प्रस्तावित करणारे अधीक्षक भारतसिंह चौव्हाण यांनी फायर रेस्क्यू वाहनाच्या अनियमिततेत ‘की-रोल’ वठविल्याचा आरोप आहे. बाजारभावाची शहानिशा न करता महापालिकेने या वाहनापोटी कंपनीला रेकॉर्डब्रेक वेळेत १.९४ कोटी रुपये बहाल केले. त्यानंतरही देयकाबद्दल अग्निशमन अधीक्षकांनी चालविलेली लपवाछपवी अनियमिततेला दुजोरा देणारी ठरली आहे. यात अधीक्षक हे ‘छोटा मासा’, तर मास्टरमाइंड ही महापालिकेबाहेरील व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ मे रोजीच्या तक्रारीत मास्टरमाइंडचे नाव नमूद आहे.मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहनाच्या निविदाप्रक्रियेत गौडबंगाल झाल्याच्या तक्रारींवरून विविध पातळ्यांवरून चौकशी सुरू आहे. अधीक्षकांसह संबंधितांची गतिमानता या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपाला बळ देणारी आहे. १६ डिसेंबर २०१७ रोजी वाहन प्राप्त झाल्यानंतर अधीक्षक चौव्हाण यांनी ते सुयोग्य ठरविले. निविदा सूचनेतील अटी-शर्ती व तांत्रिक तपशिलाप्रमाणे वाहनाचा तंत्रशुद्ध पुरवठा केल्याने निधी एंटरप्रयजेसचे २ कोटी ४ लाख २७ हजार ७०० रुपयांचे देयक मंजूर करण्यात यावे, असे त्यांनी प्रस्तावित केले. वास्तविक, वाहनात निविदा सूचनेतील अटी-शर्तीनुसार व तांत्रिक घटक आहेत की कसे, हे पाहण्यासाठी चौव्हाण तज्ज्ञ नाहीत. निविदा सूचनेमधील त्या वाहनाबाबत १२ पेक्षा अधिक पानांचे स्पेसिफिकेशन आहे. किमान शहर अभियंता वा कार्यशाळा अभियंत्यांनी तपासणी करणे अभिप्रेत असताना, चौव्हाणांनी स्वअधिकारात ते वाहन योग्य ठरविले. मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी, उपायुक्त वा आयुक्त यांनाही ती बाब खटकली नाही. त्या वाहनाची डिलिव्हरी घेण्यापूर्वी कुठल्या निकषावर तपासणी केली, कुणाकडून करून घेतली, याची नोंद अग्निशमन विभागात नाही. अनुभवाच्या बळावर संपूर्ण तपासणी केली. कुणालाही देयकाची घाई असते. त्यामुळे लागलीच देयक प्रस्तावित केले, असे सांगणाऱ्या चौव्हाण यांनी देयकाबाबत लपवाछपवीची भूमिका घेतली होती. या वाहनाचे देयक आपण प्रस्तावित केले नाही, आपणास काहीही माहिती नाही, आपण उद्या या, असे सांगत अधीक्षकांनी १.९४ कोटी रुपये डिसेंबरमध्येच दिले गेल्याची बाब दडपविण्याचा प्रयत्न केला. ‘मै बहोत छोटा आदमी हू सरजी’ असे सांगत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांनी सांगितले ते करावेच लागते, अशी मखलाशी केली आणि दुसºया दिवशीच आपण टेन्शनमध्ये आलो, घाबरलो, त्यामुळे असंबद्ध उत्तरे दिल्याच्या कबुलीतूनच ‘टॉप टू बॉटम’ बहुतेकांचे खिसे यात गरम झाल्याच्या आरोपाला दुजोरा मिळाला. २२ डिसेंबरला देयक दिल्यानंतरही या वाहनासाठी आवश्यक चेसिसचेच देयक थेट कंपनीला अदा करण्यात आले, ‘निधी’ला कुठलेही देयक देण्यात आले नसल्याचा दावा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनी केला होता, हे विशेष.तोंड पोळले तरीही....सायबरटेक प्रकरणात महापालिकेचे तोंड आधीच पोळले आहे. सायबरटेकने केलेले काम निरर्थक ठरविण्यात आले. मात्र, त्याआधीच ९० टक्के रक्कम देण्यात आल्याने महापालिकेचा नाइलाज झाला. त्याच्या पार्श्वभूमीवर आधीच तोंड पोळले असताना महापालिका प्रशासनाने निधी एंटरप्रायजेसला संपूर्ण रक्कम देण्याची घाई का केली, हे अनुत्तरित आहे. मात्र, साखळीतील बहुतेकांना आपआपला वाटा मिळाल्याने देयक रेकॉर्डब्रेक वेळेत देण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे.फायलीचा प्रवास द्रुतगतीनेशनिवार १६ डिसेंबर २०१७ रोजी २.०४ कोटी रुपयांचे फायर वाहन महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर लगेचच सोमवारी अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चौव्हाण यांनी अत्यंत गतिमानतेने देयकाच्या फायलीचा प्रवास सुकर केला. देयकाच्या सर्व फायली डाक किंवा लिपिकांकरवी आणाव्यात, या आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली. चहापानाच्या ५०० रुपयांच्या देयकावर शंभर त्रुटी काढणाºया अधिकाºयांनीही वेळ न दवडता १८ आणि १९ डिसेंबरला देयक ‘ओके’ केले. स्वाक्षरी करण्याशिवाय कुणालाही कुठलाही प्रश्न पडला नाही. यावरून हेमंत पवारांसह प्रशासनिक अधिकाºयांची कमालीची गतिमानता अधोरेखित झाली आहे.