शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वे बी झोनमधून टोम्पे कॉलेजची टीम विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 18:46 IST

८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे स्थानिक स्व. मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत चांदूर रेल्वे 'झोन बी'मधून अंतिम सामन्यात चांदूर बाजार येथील टोम्पे महाविद्यालयाच्या चमूने बाजी मारली. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या हस्ते व प्राचार्य जयंत कारमोरे यांच्या अध्यक्षतेत झाले. अमरावती, चांदूर रेल्वे, आसेगाव पूर्णा, शेंदूरजना घाट, चांदूर बाजार, मोर्शी, नांदगाव पेठ, पिंपळखुटा, वरुड, नेरपिंगळाई, कुऱ्हा, बडनेरा, तिवसा, भातकुली, धारणी, जरूड, वलगाव आदी येथील महाविद्यालयीन चमू सहभागी झाल्या होत्या. उपांत्य सामना श्रीराम कॉलेज कुऱ्हा विरूद्ध केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती यांच्यात झाला. यात केशरबाई लाहोटी महाविद्यालयाने बाजी मारली. दुसरी लढत टोम्पे कॉलेज चांदूर बाजार विरुद्ध डीसीपीई एचव्हीपीएम कॉलेज अमरावती यांच्यात झाली. यामध्ये टोम्पे कॉलेज चांदूर बाजार विजयी झाली. यानंतर केशरबाई लाहोटी कॉलेज व टोम्पे कॉलेज यांच्यात झोनमधील अंतिम सामना झाला. यामध्ये टोम्पे कॉलेजने दणदणीत विजय प्राप्त केले. आता चार झोनमधून चार विजयी संघाचे उपांत्य व अंतिम सामना होणार असुन त्यानंतर विद्यापीठातुन विजयी संघ ठरणार आहे. सदर स्पर्धांकरिता प्राचार्य जे.डी. कारमोरे यांच्यासह शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका आणि क्रीडा स्पर्धेच्या आयोजिका डॉ. अलका करनवाल यांसह प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. व्हॉलीबॉल स्पर्धांचे परीक्षण महाराष्ट्र व्हॉलीबॉल रेफरी बोर्डचे सदस्य संजय बढे आणि संजय देशमुख यांनी केले. अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत अकोला, चांदूर रेल्वे, बुलडाणा आणि यवतमाळ यांच्यात होणार आहे. चारही विभागांमधून विजयी ठरणाऱ्या संघात अंतिम सामना १४ आॅक्टोबरला मुंधडा महाविद्यालयातच होईल. जिंकणाऱ्या संघास फिरता चषक विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण विजय संघातून आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी चमूची निवड चाचणी मुंधडा महाविद्यालयातच १५ ते १७ आॅक्टोबर दरम्यान होईल. 

टॅग्स :Amravatiअमरावती