शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:38 IST

महानगरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने महिला, युवतींची होणारी कुचंबणा लक्षात घेता पुणेच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे साकारले जाणार आहेत.

ठळक मुद्देप्रणय कुळकर्णी यांचा पुढाकार: महापालिका स्थायी समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार

आॅनलाईन लोकमतअमरावती : महानगरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने महिला, युवतींची होणारी कुचंबणा लक्षात घेता पुणेच्या धर्तीवर शहरात २७ ठिकाणी प्रसाधनगृहे साकारले जाणार आहेत. भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून स्थायी समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली असली तरी शहरात सार्वत्रिक ठिकाणी प्रसाधनगृहे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे वास्तव आहे. विशेषत: महिला, युवतींची कुचंबणा होते. यापूर्वी सार्वत्रिक ठिकाणी फायबर टॉयलेटची उभारणी करण्यात आली. पण, ते फायबर टॉयलेट कसे होते, हा संशोधनाचा विषय असल्याचे नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांनी आयुक्तांना पत्राद्वारे कळविले होते. मात्र, शहरात विविध ठिकाणी प्रसाधनगृहे असावेत, यासाठी त्यांनी महापालिकेच्या गतआमसभेत प्रश्न क्रमांक १७२ अन्वये सार्वजनिक शौचालये आणि मूत्रिघरांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रसाधनगृहांची माहिती वजा वस्तुस्थिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग देऊ शकला नाही. त्यामुळे कुळकर्णी यांनी आक्रमक पावित्रा घेत आठ लाख लोकसंख्येच्या महानगरात सार्वत्रिक प्रसाधनगृहे साकारू शकत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. यावेळी प्रशासनाने प्रसाधनगृहांसाठी जागा दुरुस्ती खर्च, पाणीव्यवस्था, बांधकामासाठी निधी आदींबाबत समर्पक उत्तरे दिले नाहीत. परिणामी पुणेच्या धर्तीवर अमरावती महानगरातही पक्के बांधकाम असणारे प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, अशी मागणी प्रणय कुळकर्णी यांनी केली. त्यांच्या मागणीला सभागृहात अन्य सदस्यांनीसुद्धा समर्थन दिले. अखेर प्रशासनाने महानगरात सार्वत्रिक जागी २७ प्रसाधनगृहे साकारण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक कुळकर्णी यांनी नागरिकांच्या समस्यांवर लक्ष वेधल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.येथे साकारणार प्रसाधनगृहेनवसारी बसस्टॉप, गाडगेबाबा समाधीजवळ, पंचवटी पीडीएमसी, शेगाव चौक, कठोरा नाका, राजकमल उड्डाणपुलाखाली, अंबादेवी मार्ग, मालटेकडी रस्त्यालगत, चित्रा चौक, इतवारा बाजार मार्केट, प्रभात चौक, नगर वाचनालय, नमुना चापोरकर कॉम्प्लेक्स, राजापेठ शाळेजवळ, राजापेठ अंबानाला, पूज्य बाबा दरबार, सिटी कोतवालीसमोर, राजकमल महापालिका मुख्यालय, यशोदानगर, चपराशीपुरा शुक्रवार बाजार, दक्षिण प्रभागीय कार्यलय, बडनेरा जुनीवस्ती दर्ग्याजवळ, नवाथे प्लॉट नाकाजवळ, दस्तुरनगर गौरक्षण समोर, सराफा बाजार जवाहर गेट या २७ जागांचा समावेश आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक ९८/२०११ च्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वत्रिक जागेवर प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, असे बंधनकारक आहे. मात्र, महापालिका यात माघारल्याने ही बाब लक्षात आणून दिली.- प्रणय कु ळकर्णी, स्वीकृत नगरसेवक