शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी, कुबेर अन् नव्या केरसुणीची आज पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या भगवान विष्णूने वामन रूप धारण करून बळीराजाला तीन पायात दान मागितले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भूलोकवासी त्यांच्या आठवणीनिमित्त प्रत्येकवर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते.

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे :  प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी केलेला दीपोत्सव अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.दिवाळी हा सण अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येतो. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या भगवान विष्णूने वामन रूप धारण करून बळीराजाला तीन पायात दान मागितले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भूलोकवासी त्यांच्या आठवणीनिमित्त प्रत्येकवर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते. दिवाळीच्या एक दिवस अगोदर चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंद झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता. २५००  वर्षांपूर्वी गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीला बिहारमधील पावापुरी येथे शरीर त्यागले. महावीर संवत्सर  त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे.

असे करावे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करताना चौरंग अथवा पाट घेऊन त्यावर लाल अथवा पिवळे वस्त्र टाकले जाते. त्यावर स्वस्तिक काढावे. लक्ष्मीची मूर्ती व फोटो ठेवावा. पूजेसाठी सोने, चांदी, नाणे, नारळ, खोबरे,  खडीसाखर, बतासे, फळ, लवंगा, धने, लाह्या ठेवाव्यात. जोड पानावर खारीक, बदाम, सुपारी ठेवण्यात येते. घरात गाईची व  लक्ष्मीची पाऊले काढल्यानंतर व सर्व प्रथम तेलाचा दिवा लावतात. अशाप्रकारे लक्ष्मीची पूजा करण्यात येते.

केरसुणीला महत्त्व नव्या केरसुणीची घराच्या बाहेर उजव्या बाजूस पूजा केली जाते. कुंकवाने स्वस्तिक काढण्यात येते. त्यावर नवीन केरसुणी ठेवल्यानंतर जुनी केरसुणी घरातील आतील भिंतीवर ठेवून लक्ष्मीपूजनाच्या अगोदर त्या केरसुणीने झाडत आणतात आणि केरसुणी उंबरठ्यावर आडवी ठेवून तिचा एक फळ तोडून बाहेर फेकण्यात येते. असा घराघरांत करण्यात येतो.