शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल फाॅर्मवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींनी परीक्षा केंद्रांवर भेटी देत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. 

ठळक मुद्देपर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी

n  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत २६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा सोमवार, २ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. विद्या परिषदेच्या निर्णयानुसार महाविद्यालय स्तरावर परीक्षांचे संचालन करण्यात आले आहे. गत सात दिवसांत पदवी, पदव्युत्तर  विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत घेण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल फाॅर्मवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींनी परीक्षा केंद्रांवर भेटी देत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. पर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजीपर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजता परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पयार्वरण अभ्यासक्रमाची परीक्षा अनुत्तीर्ण झाले असतील, अशांनाही विद्यार्थ्यांना ही अंतिम वर्षाची परीक्षा देता येईल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका प्राचार्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

२७२८२ शनिवारी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अंतिम वर्षाचे २७ हजार २८२ विद्यार्थ्यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी परीक्षा दिली आहे. यात १४११० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर १३ हजार १७२ ऑनलाईन परीक्षा दिली आहे. एकूण ६१३ परीक्षा घेण्यात आल्या असून, ९७.८० टक्के उपस्थिती नाेंदविण्यात आली आहे.

मोर्चे, आक्षेपानंतरही परीक्षा ‘सुरळीत’ विद्यपीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याच्या निर्णयाविरुद्ध गत आठवड्यात विविध विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला. शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदविले. बहि:शाल विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तथापि, या परीक्षेत कोणताही खंड न पडता ३७४ महािवद्यालयांत परीक्षा ‘सुरळीत’पणे घेण्यात आल्या आहेत. एकाही परीक्षा केंद्रावर तक्रार न उद्‌भवता सोमवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडणार आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी निर्धोकपणे परीक्षांना सामोरे गेले आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा