शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भांडायचे, रडवायचे अन् चौर्यकर्म फत्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

एकाच वेळी तीन महिलांनी ऑटो वा एसटी बसमध्ये बसायचे. आपसात भांडण करून, परस्परांना शिव्या देत अन्य प्रवाशांचे ध्यान आपल्याकडे वळवायचे, जवळ असलेल्या चिमुकल्यांना चिमटा घेऊन त्यांना रडवून सहानुभूती मिळवायची, महिलेशेजारच्या तिच्या पती वा नातेवाईकाला उठवून त्या महिलेजवळ स्वत: बसायचे अन् काम फत्ते करायचे, अशी त्यांची चोरीची पद्धत. अटक तीनही महिलांनी ती ‘मोडस ऑपरेंडी’ पोलिसांसमोर उलगडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑटो तथा एसटीतील महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लांबविणारी ‘सुवर्ण टोळी’ गजाआड करण्यात ‘टीम गाडगेनगर’ला यश आले आहे. दुभाषाकडून आरोपींची कबुली समजून घेतल्यानंतर शनिवारी त्यांच्याकडून तब्बल १७४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तीन महिलांना अटक केल्यानंतर त्यांच्या पाच पुरूष पाठीराख्यांना अटक करण्यात आली. त्यातून महिला आरोपींची चोरी करण्याची अफलातून पद्धत देखील उलगडली.एकाच वेळी तीन महिलांनी ऑटो वा एसटी बसमध्ये बसायचे. आपसात भांडण करून, परस्परांना शिव्या देत अन्य प्रवाशांचे ध्यान आपल्याकडे वळवायचे, जवळ असलेल्या चिमुकल्यांना चिमटा घेऊन त्यांना रडवून सहानुभूती मिळवायची, महिलेशेजारच्या तिच्या पती वा नातेवाईकाला उठवून त्या महिलेजवळ स्वत: बसायचे अन् काम फत्ते करायचे, अशी त्यांची चोरीची पद्धत. अटक तीनही महिलांनी ती ‘मोडस ऑपरेंडी’ पोलिसांसमोर उलगडली. मेअखेर बॅग लिफ्टिंगच्या घटनांना अंजाम देणाऱ्या तीन चोर महिलांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले होते. त्या चोर महिलांनी पीसीआर दरम्यान दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील   पाचोरा येथील पाच पुरुष आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ११ गुन्ह्यातील फिर्यादींनी आरोपी महिलांना ओळखले. 

महिलांना नाही मोबाईलचा मोहटोळीतील तीनही महिला चौर्यकर्म करतेवेळी स्वत:जवळ मोबाईल बाळगत नाहीत. ऑटो वा बस प्रवासादरम्यान महिलांकडून सोन्याचे दागिने वा रक्कम चोरल्यानंतर जवळच्या थांब्यावर उतरून तिघीही वेगवेगळ्या दिशेने जातात. तेथून एखाद्याकडून कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन आपल्या सहकारी पुरुषांना फोन करून आपले स्थळ कळवायचे. एका दिवशी एकच चोरी वा बॅगलिफ्टिंग करून रात्रीच्या वेळी भाड्याच्या खोलीत एकत्र यायचे, आपण विवाहित जोडपी आहोत, हे दाखविण्यासाठी आरोपी बडनेरा व लालखडी हद्दीत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. तसा या आठ आरोपींचा शिरस्ता असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले.

पाचोऱ्याचा आकाश मास्टरमाईंडतीन महिलांसह विष्णू शंकर वैदू (२७), आकाश गोपाल वैदू (४०), कुमार शंकर वैदू (३५), आर्या गोपाल साखरे (३०) व सोनू गोपाल साखरे (२८, सर्व रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आकाश वैदू हा ही टोळी संचालित करतो व तोच मास्टरमाईंड असल्याची माहिती आहे. गाडगेनगर पोलिसांनी विष्णू वैदूच्या घरातूनच १५० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. २४ ग्रॅमचा सोन्याचा गोफ देखील हस्तगत केला. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील ‘टीम गाडगेनगर’ने त्या चोरांकडून तब्बल ११ गुन्ह्यांची कबुली मिळविली.

 

टॅग्स :Thiefचोर