तिवसा : तालुक्यातील सर्वांत मोठ्या १७ सदस्यीय कुऱ्हा ग्रामपंचायतवर भाजप व कम्युनिस्ट पक्षप्रणीत पॅनेलचा विजय झाला. येथे अमोल बंगरे, मीना नायर, अनिता जैतवार, राजेश नेवारे, प्रियंका शिंगाणे, अनिता पटेल, कल्पना कुंजाम, राजाभाऊ बाभूळकर, सलीम खान, मृणाल इंगळे, ज्योत्स्ना इखार, बाबाराव राऊत, सुरेंद्र राऊत, रत्ना भामोदे, एजाज खान, परवीनबानो खान, छाया खंडारे यांचा विजय झाला.
-------------------------
फोटो पी १९ तळेगाव
तळेगाव ठाकूर ग्रामपंचायतमध्ये सतीश पारधी गटाचा विजय
तिवसा : तालुक्यातील तळेगाव ठाकूर या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सतीश पारधी गटाचा विजय झाला. तळेगाव ठाकूर ग्रामपंचायतवर पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. आता मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पारधी यांच्या गटाचा एकहाती विजय झाला. या १५ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये जितेंद्र बायस्कर, कामिनी कांबळे, निर्मला कानोरे, महादेव पाटील, वैशाली बेलोरकर, सै. नूरजहान अनिस, सतीश पारधी, माला कावलकर, ज्योती पोहरे, श्रीहरी मसराम, संजय कुबडे, संगीता पाटील, दर्शना मारबदे, मंगेश राऊत, रूपाली गोडबोले यांचा विजय झाला.
--------------------------