शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील आठ जिल्ह्यांत वाघांसाठी ‘कॅरिडोर’, चंद्रपूरमध्ये वाघांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 16:42 IST

विदर्भात आठ जिल्ह्यांमध्ये जंगलात ‘कनेक्टिव्हिटी’ निर्माण करून वाघांना मुक्त श्वास घता यावा या दृष्टीने ‘कॅरिडोर’ निर्माण करण्याचे विचाराधीन आहे.

गणेश वासनिक अमरावती : वाघांची वाढती संख्या आणि वाघांना जंगलात मुक्तसंचार करता यावा, यासाठी विदर्भात आठ जिल्ह्यांमध्ये जंगलात ‘कनेक्टिव्हिटी’ निर्माण करून वाघांना मुक्त श्वास घता यावा या दृष्टीने ‘कॅरिडोर’ निर्माण करण्याचे विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने वनविभागाने केंद्र सरकारच्या ‘एनटीसीए’कडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे.राज्यात एकूण ६ व्याघ्र प्रकल्प असून मेळघाट, पेंच, बोर, नवेगाव - नागझिरा, ताडोबा असे ५ व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. तसेही विदर्भात वाघांच्या संख्येने १७५ पेक्षा अधिक आकडा पार केल्याचे नुकतेच झालेल्या व्याघ्र गणनेवरून स्पष्ट होत आहे. कळमेश्वर, काटोल, उमरेड - कºहांडला, टिपेश्वर, राळेगाव या भागातसुद्धा १५ ते २० च्यावर स्थलांतरित वाघ आढळून आले आहे. त्यामुळे वाघांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने कॅमेरा ट्रॅप, कॉलर, आयडी, फोटोग्राफ अशा विविध पद्धतीने वाघांचे ‘मॅनेटरिंग’ केले जाते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबासहीत इतर तालुक्यांमध्ये वाघांची संख्या वाढल्यामुळे या जिल्ह्यात  वाघांना मुक्त संचारसाठी वनक्षेत्र कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघांचे संरक्षण, संवर्धनाच्या अनुषंगाने उमरेड, कºहांडला, चिमूर पुढे नवेगाव, नागझिरा, रामटेक, पेंच, कळमेश्वर, काटोल, कोंढाळी आणि बोर अशा पद्धतीने जंगलाची संलग्नता करण्याचा प्रस्ताव वनविभाग केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. हा कॅरिडोर ताडोबापासून प्रारंभ आणि बोरमध्ये समाप्त करण्याच्या दृष्टीने वनविभागाने सूक्ष्म अभ्यास केला आहे. मात्र, हा कॅरिडर निर्माण करीत असताना राष्टÑीय महामार्ग, राज्य महामार्ग, रेल्वे, वाहतूक रस्ते आदींचा विचार करणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी जंगलाची संलग्नता ठेवण्यासाठी बोगदा ही पद्धत आत्मसात केली जाणार आहे. 

कॅरिडोरचे मॉपिंगविदर्भातील वाघांना वाढीव जंगल मिळावे, यासाठी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा असे कॅरिडोर निर्माण करताना कॅरिडोरचे मॉपिंग केले जाणार आहे. कॅरिडोर निर्माण करताना वाघांना ये-जा करताना येणाºया मानव अडचणीचा विचार करून सीमेनुसार संलग्न जंगलाची तपासणी केली जाणार आहे.

 मेळघाटला जोडणे अशक्यविदर्भातील ५ पैकी ४ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांसाठी कॅरिडोर निर्माण करताना केवळ रस्त्यांची आडकाठी येणार आहे. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या एका टोकावर असल्याने आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत वसल्याने नागपूर जिल्ह्यातून मेळघाट व्याघ्र प्रकल्प असा वाघांचा मार्ग निर्माण होऊ शकत नाही. परंतु, बोर प्रकल्पातून पोहरा-चिरोडी राखीव वनक्षेत्रापर्यंत कॅरिडोर’ होण्याची शक्यता आहे.

 संरक्षित वनक्षेत्राव्यतिरिक्त वाघांचे संरक्षण, संवर्धन करणे हे आव्हान आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांना जंगलाशी जोडण्यासाठी ‘कॅरिडोर’ निर्माण करता आल्यास ते वाघांच्या संरक्षणासाठी पूरक ठरेल. राज्य शासनाच्या मान्यतेनंतरच तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर

टॅग्स :TigerवाघMelghatमेळघाट