शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:14 IST

जिल्हाभर वाघाने मागील १४ दिवसांपासून दहशत पसरवली असतानाच, चिखलदरा शहराच्या पांढरी भागात वाघाने गाईसह म्हशीला ठार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देपांढरी परिसरात गाय, म्हशीची शिकार : वाघाने मारला कॅमेराला पंजा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जिल्हाभर वाघाने मागील १४ दिवसांपासून दहशत पसरवली असतानाच, चिखलदरा शहराच्या पांढरी भागात वाघाने गाईसह म्हशीला ठार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वनखंड क्रमांक ३९ मध्ये ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वाघाने गाईवर हल्ला केला, तर दुपारी २ वाजताच्या दरम्यान म्हशीला ठार केले. हल्ला करणारी वाघिण असून, तिच्यासह दोन बछडे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वनविभागाच्यावतीने पशुपालकांना शासननिर्णयानुसार मदत दिली जाणार असल्याचे चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी डी.के. मुनेश्वर यांनी सांगितले. मागील काही दिवसांमध्ये जंगलातील प्राण्यांनी गावाकडे धूम ठोकल्याने नागरिक चांगलेच दहशतीखाली आले आहेत. बागलिंगा, टेंब्रुसोंडा परिसरात बिबट्या व दोन तडशांचा मृत्यू झाला होताआणि कॅमेरावर मारली झापडचिखलदरा परिसरातील वनविभागासह व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी जंगलांमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहेत.दोन गुरांची शिकार करणाऱ्या वाघिणीचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दोन्ही गुरांची शिकार करताना कॅमेरे हा घटनाक्रम कैद करीत होते. शिकार झाल्यानंतर वाघाने झाडाला लावलेल्या त्या कॅमेºयावर चवताळून येऊन एक थप्पड लगावल्याचे कैद झाले. त्यामुळे फोटो काढला, तर वाघोबालासुद्धा राग येतो असेच म्हणावे लागेल. दरम्यान, वनकर्मचारी वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे आदेशवाघ इथे दिसला, तिथे दिसला, या विविध अफवांमुळे वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शुक्रवारी वरूड परिसरासह काहींना गुरुवारी कारंजा बहिरम, करजगाव परिसरात वाघ दिसला असल्याचे सांगितले. परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी तत्काळ कर्मचाºयांसह स्वत: जाऊन पाहणी केली असता, काहीच आढळून आले नाही. वरूड परिसरात तडशाचे पगमार्क आढळल्याने वनकर्मचाºयांनी तपासणीअंती स्पष्ट केले. दरम्यान, वरूड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे यांनी अफवा पसरविणाºयाविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.