शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात २० जानेवारीपासून व्याघ्र गणना; प्रथमच जीपीएस एम-ट्रॅकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 11:30 IST

वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे.

ठळक मुद्देडेहरादूनला पाठवणार अहवाल

आॅनलाईन लोकमतअमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे. पहिल्यांदाच ‘जीपीएस एम-टॅक’ हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. पायांचे ठसे, ट्रॅपिंग कॅमेरे, पारंपरिक पद्धतीदेखील व्याघ्र गणनेची वैशिष्ट्ये राहणार आहेत.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने २० जानेवारीपासून व्याघ्र गणनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘जीपीएस एक-ट्रॅक’ ही प्रणाली पहिल्यांदाच वापरली जात असल्याने व्याघ्र प्रकल्पात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ३१ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. यापूर्वी २०१४ मध्ये व्याघ्र गणना झाली. त्यानंतर आता जानेवारी २०१८ मध्ये होत आहे. मेळघाटात दोन टप्प्यात गणना होणार असून, पहिल्या टप्प्यात ७ जानेवारी २०१८ पर्यंत ट्रॅपिंग कॅमेरे, तर दुसऱ्या टप्प्यांत १५ जानेवारीपासून पाच दिवस ‘जीपीएस एम-ट्रॅक’द्वारा गणना केली जाईल. त्रृट्यांबाबतचे प्रशिक्षण १८ जानेवारी रोजी देण्यात येईल. त्यानंतर व्याघ्र गणनेत २० ते २९ जानेवारीदरम्यान वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा, शिकारीचे प्रकार आदींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाईल. २६ ते ३१ जानेवारी दरम्यान प्रपत्र तपासले जातील. त्यानंतर व्याघ्र गणनेचा १ ते २० फेब्रुवारीदरम्यान डेटा अपलोड केला जाईल. गणनेची अंतिम माहिती डेहरादून येथे २८ फेब्रवारी ते १५ मार्च २०१८ दरम्यान पाठविली जाईल, असा अधिकृत कार्यक्रम व्याघ्र गणनेचा मेळघाटने तयार केला आहे.पायी गस्तजंगल व वन्यजिवांच्या संरक्षणासाठी वनकर्मचाऱ्यांना जंगलात पायी गस्त घालण्याची सक्ती आहे. जीपीएस एम- ट्रॅक अ‍ॅप्लिकेशनमुळे कोणी, किती अंतर गाठले, हे क्षणात कळते. हीच प्रणाली व्याघ्र गणनेसाठी वापरली जाईल, असे डीएफओ माळी यांनी सांगितले.

व्याघ्र गणनेसाठी पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक अ‍ॅप्लिेकशन वापरले जात आहे. २० ते २९ जानेवारीदरम्यान व्याघ्र गणना होईल. गणनेसाठी पारंपरिक व अत्याधुनिकतेची जोड आहे.- एम.एस. रेड्डी,संचालक, व्याघ्र प्रकल्प मेळघाट

टॅग्स :TigerवाघMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प