शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

चंद्रपूरचा नरभक्षक वाघ सातपुडा टायगर रिझर्व्हच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 7:59 PM

मध्य प्रदेशच्या जंगलात चार गुरांची शिकार

ठळक मुद्देवनविभागाने वाघाला नजरकैदेत ठेवले आहे१८ ते ३० आॅक्टोबरपर्यंत चंद्रपूरच्या अडीच वर्षीय युवा वाघाने अक्षरश: धुमाकूळ घातला.वाघ मोर्शी परिसरातील जंगलातून मध्यप्रदेशात शिरला

नरेंद्र जावरे/परतवाडा (अमरावती) : बारा दिवस अमरावती जिल्ह्यात प्रचंड दहशत पसरविणाºया नरभक्षक वाघाने मध्यप्रदेशच्या ताप्ती नदीचे जंगल पार करून सातपुडा टायगर रिझर्व्हच्या दिशेने कूच केली आहे. आतापर्यंत त्याने येथील जंगलात पाळीव चार गुरांची शिकार केली. वनविभागाने त्याला नजरकैदेत ठेवले असून, उत्तर-पश्चिम दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्याची परतण्याची शक्यता सध्या मावळली आहे.    जिल्ह्यात १८ ते ३० आॅक्टोबरपर्यंत चंद्रपूरच्या अडीच वर्षीय युवा वाघाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन माणसांसह गुरांचा फडशा त्याने पाडला. उत्तर दिशेने निघालेला वाघ मोर्शी परिसरातील जंगलातून मध्यप्रदेशात शिरला. १० दिवसांपासून त्याची वाटचाल उत्तर-पश्चिम दिशेने सुरू आहे. या दहा दिवसांत त्याने जंगलाला लागून असलेली आदिवासी खेडी ओलांडत पुढील प्रवास सुरू ठेवला. अनेकांनी त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिले. मात्र, या परिसरात एकाही माणसावर त्याने हल्ला केला नसल्याचे बैतुल उत्तर झोनचे उपवनसंरक्षक अशोक कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

दिवाळीच्या दिवशी बैतुल टाऊन केले पारमोर्शी, सालबर्डी, दाबका, जामगाव खडका, जामठी पांढरघाटी, उमरी, धारूड होत वाघोबाने पलासपानी जंगलात तीन दिवस बस्तान मांडले. त्यानंतर आठनेर परिक्षेत्रात बनबेहरा जंगलातून ताप्तीचे जंगल पार केले. दिवाळीच्या दिवशी बैतूल टाऊन जंगलातून उत्तर पश्चिम दिशा घेत त्याने पुढील प्रवास सुरू ठेवला आहे. सातपुडा टायगर रिझर्व्हमध्ये तो बस्तान मांडणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. घनदाट अरण्यात चौसिंगा, हरण, ससा, सांबर असे मोठ्या प्रमाणात तृणभक्षी आहेत. परिसरातील गुरांवरही तो हल्ला करून आपले पोट भरू शकतो. मुबलक प्रमाणात पाणी, आवश्यक असलेले जंगल या सर्व सोई असल्याने कायमचे बस्तान मांडण्याचे शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ‘लोकमत’ने भाकीत पूर्वीच वर्तविले होते, हे विशेष. 

प्रत्येकी सहा तासांचे लोकेशन मध्यप्रदेशच्या जंगलात आलेला हा पाहुणा दिवसभर काय करतोे, याचे प्रत्येकी सहा-सहा तासांचे लोकेशन वनविभागाच्यावतीने घेतले जात आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. मध्यप्रदेशच्या जंगलात गेल्या दहा दिवसांपासून वाघामागोमाग वनकर्मचाºयांचा प्रवास सुरू आहे. त्याला कुठेही त्रास होऊ नये, याची दक्षता मध्य प्रदेश वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने घेतली जात आहे. 

वाघाने आतापर्यंत चार गुरांची शिकार केली. तो घनदाट अरण्यात रमला आहे. उत्तर पश्चिम दिशेने त्याचा प्रवास अजूनही कायम आहे. त्यामुळे त्याच्या परतण्याची शक्यता फार कमी आहे. आवश्यक पोषक वातावरण त्याला येथे मिळाले आहे.- अशोक कुमार, उपवनसंरक्षक बैतुल उत्तर (मध्यप्रदेश)

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावतीMadhya Pradeshमध्य प्रदेश