नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या चमूने शुक्रवारी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील भैसदेही येथे ऑपरेशन राबवित वाघ बिबटच्या हाडासह अस्वलाचे पंजे, रानडुकराचा जबडा असे अवयव जप्त केले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वाघ, बिबट, अस्वल या प्राण्यांची शिकार करण्यात आली होती. त्याप्रकरणी अनेक दिवसांपासून तपास सुरू होता. त्या तपासाची दिशा पाहता मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ क्राईम सेलचे उपवनसंरक्षक मनोजकुमार खैरनार यांच्या चमुने भैसदेही परिसरात एका घरी छापा टाकला. तेथून वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक मनोजकुमार खैरनार व सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या पथकाने बैतूल जिल्ह्यातील भैसदेही परिसरात चौघांना अटक केली. त्यांच्याकडून वाघ, बिबट्याची हाडे, अस्वलाचे पंजे जप्त करण्यात आले.- एम. एस. रेड्डी,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकव्याघ्र प्रकल्प, अमरावती
मध्यप्रदेशात वाघ, बिबटची हाडे, अस्वलाचे पंजे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 21:13 IST
मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या चमूने शुक्रवारी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील भैसदेही येथे ऑपरेशन राबवित वाघ बिबटच्या हाडासह अस्वलाचे पंजे, रानडुकराचा जबडा असे अवयव जप्त केले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
मध्यप्रदेशात वाघ, बिबटची हाडे, अस्वलाचे पंजे जप्त
ठळक मुद्देरानडुकराचाही समावेश मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलची बैतूल येथे कारवाई