लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील भिलोना शिवारात रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास व्याघ्र दर्शन झाले. भिलोना येथील शेतकी कृषी विद्यालय परिसरात बांधलेल्या वासराला त्या वाघाने ओरबाडले. दरम्यान गाईने केलेल्या आरडाओरडामुळे तेथे कार्यरत अर्जुन डोंगरदिवे याचे लक्ष त्या वाघाकडे गेले. वाघ बघून अर्जुन डोंगरदिवेची बोलतीच बंद झाली. दरम्यान वासराच्या प्रेमापोटी त्या गाईने दोर तोडून वाघावर हल्ला चढविला. गाईची आक्रमकता बघून त्या वाघाची पळता भूई थोडे, अशी गत झाली होती.घटनास्थळी वाघाने ओरबाडल्यानंतर वाघाच्या नखातून पडलेले वासराच्या अंगावरील केस आढळून आलेत. वाघाच्या पावलाचा ठसादेखील त्या ठिकाणी मिळाले. जमीन कडक असल्यामुळे हा ठसा थोडा अस्पष्ट उटल्याचे सांगण्यात आले. कृषी शाळेचे संचालक अजय उभाड यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक उमक व बाळापुरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. भिलोन्यातील गावकऱ्यांसह हरम आणि लगतच्या पंचक्रोशीत शेकडो गावकरी दाखल झाले. उमक आणि बाळापुरे यांच्या पथकाने त्या वाघाच्या शोधार्थ लगतचा परिसर पिंजून काढला. त्यांना ८०० मीटर अंतरावरील प्रफुल्ल दखने यांच्या मिरचीच्या शेतात वाघाचे पगमार्क स्पष्टपणे आढळून आलेत. हे पगमार्क (ठसे) महिनाभरापूर्वीचे असल्याचे दखने यांनी वनविभागाच्या या पथकाला सांगितले.शेतकरी संतप्तचालू आठवडाभरातील या घटनांबाबत वनविभागाला शेतकऱ्यांकडून माहिती देण्यात आली. परंतु, वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. उलट या परिसरात वाघ नाही. तुम्ही बघितलेला, तुम्हाला दिसलेला तो वाघ असूच शकत नाही, अशी भूमिका वनविभागाने घेतल्यामुळे प्रत्यक्षदर्शी वनविभागावर चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात आहेत.मंगळवारी तिघांना प्रत्यक्ष दर्शनमंगळवार १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अचलपूर-हरम रस्त्यावर तीन युवकांनी प्रत्यक्ष वाघ बघितला. वाघाच्या डरकाळीचेही ते प्रत्यक्षदर्शी ठरलेत. देवरी शिवारात गुरूवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान नामदेव कोरडे यांनी वाघाची डरकाळी ऐकल्याचे सांगण्यात येत आहे.वनविभागाची भूमिका संशयास्पदअचलपूर तालुक्यातील पथ्रोट, शिंदी बु., जटांगपूर, पार्डी, वाल्मिकपूर, कामतवाडा, पोही शिवारातही मागील २० दिवसांपासून वाघ फिरत आहे. तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यात भयभित झाले आहेत. दरम्यान हरम, भिलोना, देवरी, नौबाग शेतशिवाराकडेही वाघाची भटकंती बघायला मिळत आहे. रानडुक्कर, काळवीट, गोऱ्हा याची शिकारही उघडकीस आली. वाघाचे ठसेही आढळले. पण वनविभाग तो वाघ नव्हेच, ती शिकार वाघाची नव्हच या भुमिकेत असून वाघ बघणाऱ्यांना, वाघाची डरकाळी ऐकणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना खोटे पाडण्यातच धन्यता मानत आहे. प्रत्यक्ष अवलोकन करून साधा दिलासाही या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेला नाही. परिणामकारक उपाययोजना कार्यान्वित केलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना दिसणारा वाघ वनविभागाला का दिसत नाही? याविषयीही नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भिलोना शिवारात वाघ; वासराला ओरबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST
घटनास्थळी वाघाने ओरबाडल्यानंतर वाघाच्या नखातून पडलेले वासराच्या अंगावरील केस आढळून आलेत. वाघाच्या पावलाचा ठसादेखील त्या ठिकाणी मिळाले. जमीन कडक असल्यामुळे हा ठसा थोडा अस्पष्ट उटल्याचे सांगण्यात आले. कृषी शाळेचे संचालक अजय उभाड यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक उमक व बाळापुरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
भिलोना शिवारात वाघ; वासराला ओरबाडले
ठळक मुद्देगाईने लावले पळवून : सकाळी सव्वाआठ वाजता व्याघ्र दर्शन