शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 18:38 IST

पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले.

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले. पुढची दिशा उत्तर की पश्चिम, यावरच आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वाघाची दहशत अद्यापही कायम आहे.बारा दिवस अमरावती जिल्हा दहशतीखाली ठेवणारा नरभक्षक वाघ पाच दिवसांपासून मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील आठनेर वनपरिक्षेत्रातील जंगलात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील वनाधिकारी त्याचे दररोजचे लोकेशन घेत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत परतवाडा, मोर्शी आणि वरूड परिक्षेत्रातील वन कर्मचारी सीमाभागावर लक्ष ठेवून होते. या चार दिवसांत त्याने कुठलीच शिकार केली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाघोबाची पुढची शिकार काय, यावरच गस्तीवरील कर्मचाºयांमध्ये खल सुरू होता. त्याची पुढील वाटचाल उत्तर दिशेकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बहिरम की सातपुडा व्याघ्र प्रकल्प?चंद्रपूरपासून उत्तर दिशेचा प्रवास मध्य प्रदेशातही युवा नरभक्षी वाघाने कायम ठेवला आहे. पलासपानीतून पुढे बनबेहरा जंगलात जाताना त्याने उत्तर दिशेनेच पुढची वाटचाल केली. ही वाटचाल सुरूच राहिल्यास बैतूलच्या सातपुडा टायगर रिझर्वमध्ये तो स्थिरावू शकतो. बहिरम वाघाच्या सध्याच्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर पश्चिमेकडे आहे. तेव्हा  नरभक्षी  बहिरमच्या जंगलात येण्याची  शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवडाभर त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाघ ज्या दिशेने आला त्याच दिशेने परत जाण्याची  येत नसल्याचे काही  तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

अवनीप्रमाणे त्यालाही शूट करायवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत पसरून अनेकांचा जीव घेणाºया अवनी वाघिणीला शनिवारी गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर बारा दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालून दोन जणांचा जीव आणि पाळीव प्राण्यांची शिकार करणाºया युवा वाघाला केवळ बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन देण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या. वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी त्याला अडकविण्यासाठी पिंजरा लावला. चतुर वाघाने मार्ग बदलू पुढचा पल्ला गाठला. वाघ पुन्हा परतल्यास त्याला हमला करण्यापूर्वी तत्काळ जेरबंद किंवा गोळ्या घालून ठार करण्याची ही मागणी आता अवनीला ठार केल्यानंतर होऊ लागली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ