शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीचा महिलेवर हल्ला, कंजोली गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 20:19 IST

धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कंजोली गावातील आदिवासी शेतकरी महिलेवर ई-वन वाघिणीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघड झाली.

अमरावती - धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कंजोली गावातील आदिवासी शेतकरी महिलेवर ई-वन वाघिणीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघड झाली. मीराबाई रामेश्वर कासदेकर असे जखमी महिलेचे नाव आहे. कंजोली, राणीगाव, धूळघाट रेल्वे या परिसरातील नागरिकांमध्ये ई-वन वाघिणीच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामेश्वर कासदेकर व त्यांची पत्नी मीराबाई कासदेकर हे आदिवासी कुटुंब गावाशेजारी असलेल्या आपल्या शेतातील नव्याने पेरणी केलेल्या मका पिकाच्या रखवालीकरिता रात्री शेतात गेले होते. मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना पिकात रानडुक्कर शिरल्याचा संशय आल्याने ते पिकानजीक आले. मात्र, रानडुकराऐवजी त्यांचा सामना ई-वन वाघिणीशी झाला. ती वाघीण  मीराबाई कासदेकर यांच्या अंगावर धावून गेली. तिचा पंजा हातावर पडल्याने ओरबडल्याचे व्रण उमटले. पती-पत्नीने आरडाओरड करून वाघिणीला पळविण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून नागरिकांनीही शेताकडे धाव घेतली. ई-वन वाघिणीने तेथून पळ काढला. कंजोली  येथील नागरिकांनी धूळघाट रेल्वे  परिक्षेत्रातील वनकर्मचा-यांना माहिती दिली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी मीराबाईला  धूळघाट रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले.  ती वाघीणच धूळघाट  रेल्वे वन परिक्षेत्राच्या वनअधिकारी व कर्मचाºयांनी हल्लेखोर ही ई-वन वाघीणच असल्याचा दावा केला. तिचा राणीगाव परिसरात शोध सुरू आहे. या वाघिणीने आतापर्यत चिखलदरा तालुक्यातील अनेक बकºया, कोंबड्या व अन्य जनावरे फस्त केली. दरम्यान, या संदर्भात धारणीच्या वनाधिकाºयांसोबत संपर्क होऊ शकला नाही.  धूळघाट रेल्वे परिसरात ई-वन वाघीण फिरत असल्याची माहिती आम्हाला वनाधिकाºयांनी दिली. कंजोली शिवारात आढळलेल्या पायाच्या ठशांवरून त्यांनी पडताळणी केली आहे. - बाला भिलावेकर, सरपंच, राणीगाव

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती