शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलातून वाघ, बिबटाचे कातडे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:09 IST

वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली.

ठळक मुद्देएकास अटक दुसरा पसार : शिकारी मध्यप्रदेशातील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. सुखदेव धोटे (५३, रा. गेईबारसा मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.त्याने वाघ आणि बिबटचे कातडे मोटरसायकलने पोत्यात भरून आणले होते. सोबत त्याचा साथीदारही होता. वनकर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून त्याच्याशी सौदा करीत वरुड-प्रभातपट्टण मार्गावर त्याला अटक केली. दरम्यान त्याचा सहकारी पळून गेला. त्याची मोटरसायकल जप्त करण्यात आली.ही कारवाई मेळघाट व्याघ्र्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक विशाल माळी, आकाश सारडा, जीवन दहिकार, अनिल चिमोटे, संदीप खंडारे, हरीश दामोदरे, प्रभाकर कोकाटे, सिपना वन्यजीव विभागाचे आशिष चक्रवर्ती, उल्हास भोंडे व राजेश धुमाळे यांनी केली. पुढील तपास अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक भोंडे, वरूडचे वनपरिक्षेत्र अधिकारी काळे, गायधने करीत आहे.मध्यप्रदेशात केली शिकारतस्करांनी मध्यप्रदेशच्या चितलपाठा मुलताई जंगल परिसरात या दोन्ही शिकारी केल्याची माहिती त्यांनी प्राथमिक चौकशीअंती दिली. हे कातडे शावकाचे, तर पाच वर्षांच्या बिबटाचे असावे असा अंदाज लावण्यात येत आहे.एक आरोपी पसार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत. जंगलात आणखी शिकारी सक्रिय आहेत का? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू.- विशाल माळी,उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती