शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता थम्ब इम्प्रेशनने निघणार एटीएममधून पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:35 IST

कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे.

ठळक मुद्देनवीन यंत्रणा प्रस्तावितसायबर गुन्ह्यांवर अंकुश लावण्याचे प्रयत्न

वैभव बाबरेकरआॅनलाईन लोकमतअमरावती : कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे.गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीने नवनवीन फंडे वापरून बँक खात्यांमधील रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वी एटीएमचे पिन विचारले जायचे. आता तर काहीही न विचारताही पैसे काढले जात आहेत. खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने आता बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव आखला आहे.प्रत्येक नागरिकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनने सेवेवर हजर असल्याची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने करावी लागते. हीच थम्ब सिस्टीम आता एटीएमसाठी लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. एटीएममध्ये कार्डऐवजी थम्ब इम्प्रेशनने खातेदारांना पैसे काढता येणार आहे. या प्रणालीमुळे एटीएम कार्ड वा पासवर्डची गरज राहणार नसली तरी प्रत्येकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असल्याने कुणालाही कुणाचेही पैसे सहज काढता येणार नाहीत. ही पद्धती कार्यान्वित करण्याचे मुंबई येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कारार्पेरेट सेंटरकडे प्रस्तावित असून, लवकरच ती लागू झालेली असेल, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.नागरिकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून केले जात आहेत. यासाठी आगामी काळात एटीएममध्ये थम्ब इम्प्रेशन सिस्टीम लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रस्तावित आहे.अश्विन चौधरी,मुख्य प्रबंधक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय.

टॅग्स :bankबँकatmएटीएम