लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : अवघ्या चार महिन्यांच्या गोंडस बालिकेला विहिरीत टाकून अज्ञात पालकाने पळ काढल्याची घटना रविवारी स्थानिक रामनगर शिवारात उघडकीस आली. काही वेळातच त्या बालिकेचा मृत्यू झाला. शिरजगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्याअंती अज्ञात पालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.येथील संजय सोनार हे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास रामनगर मार्गावर फिरायला गेले असता, अमर सोनार यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांना बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. त्याचवेळी सोनार यांनी गावकरी व सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. गावकऱ्यांनी सदर विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना एक बाळ दिसून आले. शेतातील ती विहीर कोरडी असल्याने आत बाळ असल्याचे क्षणात दिसून आले. त्यामुळे शेतमालक अमर अनिल सोनार व शिरजगाव कसबा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालिकेला विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीअंती ते बाळ स्त्रीलिंगी, तीन ते चार महिन्यांचे व मृत पावल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमर सोनार यांच्या तक्रारीवरून अज्ञात पालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास ठाणेदार अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. अबोध बालिकेचा परित्याग करणाऱ्या मातेचा शोध घेण्यात येईल. तूर्तास त्या बालिकेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले.सलग दुसरी घटनायापूर्वी नजीकच्या बोदळ गावातील रमेश सोलव यांच्या घराच्या लोखंडी दाराला एक वर्ष वयाची नकोशी हात बांधलेल्या स्थितीत आढळून आली होती. ती अन्यत्र जाऊ नये, यासाठी तिचा हात बांधून तिच्याजवळ एक चेंडू ठेवण्यात आला होता. रात्रीच्या किर्र अंधारात त्या चिमुकलीस बोदळ गावात दाराला बांधून ठेवत तिच्या पालकांनी पोबारा केला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळतेच करजगाव येथे अजून एका नकोशीला विहिरीत फेकण्यात आले. ती बराच वेळ विहिरीत राहिल्याने दगावली.
‘नकोशी’ला विहिरीत फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST
शेतातील ती विहीर कोरडी असल्याने आत बाळ असल्याचे क्षणात दिसून आले. त्यामुळे शेतमालक अमर अनिल सोनार व शिरजगाव कसबा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालिकेला विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीअंती ते बाळ स्त्रीलिंगी, तीन ते चार महिन्यांचे व मृत पावल्याचे स्पष्ट करण्यात आले.
‘नकोशी’ला विहिरीत फेकले
ठळक मुद्देकरजगाव येथील घटना : अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा