आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : बहिरम यात्रेत नवस फेडण्याकरिता लाखो श्रद्धाळू राज्यभरातूनच नव्हे, तर मध्यप्रदेशच्या कानाकोपºयातून येत आहेत. वर्षागणिक यात्रा बहरत आहे. भाविकांच्या सुरक्षेची हमी स्थानिक पोलीस प्रशासनावर आहे. मात्र, पोलीस गर्दीकडे काणाडोळा करू लागल्याने येथे कोणत्याही क्षणी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बहिरमबुवाचा यात्रेत तशी तर दररोजच गर्दी असते. मात्र, शनिवार व रविवारी यात्रेत अलोट भक्तांचा सागर उसळतो. अशातच लहान मुलांचे हरविणे, वाहतुकीची कोंडी, किरकोळ अपघात, भांडणे यासारख्या घटना निरंतर होत घडत आहेत. यावेळी पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. बहिरमबुवाच्या जत्रेला अधिकाधिक रंग चढू लागला आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेचा भार शिरजगाव कसबा पोलिसांवर वाढला आहे. तैनात मनुष्यबळ कमी पडत आहे. रविवारी चारजण हरविल्याची व २२ भ्रमणध्वनी चोरी गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. येत्या काळात गर्दी वाढणार असल्याने सुरक्षिततेवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आहे.वाहतूक खोळंबली, दीड तास ताटकळतरिंगण सोहळा दरम्यान यात्रेत मोठी गर्दी जमली होती. यात्रेकरू परतीच्या प्रवासाला निघाले होते. अशातच वाहतुकीची कोंडी झाली होती. ही कोंडी सोडविण्याकरिता शिरजगावचे पोलीस निरीक्षक कवाडे व वंजारी स्वत: वाहतूक सुरळीत करू लागल्याने दीड तासानंतर दोन किलोमीटर लांब गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र, यामुळे यात्रेकरूंना त्रास सहन करावा लागला.यात्रेत प्रथमच अग्निशमन दलाचे वाहनयात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस व प्रशासनही तयारीला लागले आहे. यंदा प्रथमच यात्रे दरम्यान अग्निशमन दलाचे वाहन तैनात करण्यात आले आहे. यात्रे दरम्यान मंदिर व्यवस्थापनाने परिसरात नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, अग्निशमन वाहनाचा आडोसा घेऊन येथे पोलीस शिपाई पांगताना दिसून आले. ते पाहून भाविक संताप व्यक्त करीत होते.
बहिरम यात्रेत सुरक्षेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:11 IST
बहिरम यात्रेत नवस फेडण्याकरिता लाखो श्रद्धाळू राज्यभरातूनच नव्हे, तर मध्यप्रदेशच्या कानाकोपºयातून येत आहेत.
बहिरम यात्रेत सुरक्षेचे तीनतेरा
ठळक मुद्देयात्रेकरूंची हेळसांड : पोलिसांची तारांबळ, मुले हरविली, मोबाईल चोरीस