शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

तीन ट्रॅव्हल्सची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:12 IST

विभागीय आयुक्तालयाजवळील गणेडीवाल ले-आऊट येथे रस्ताच्या कडेला उभ्या असणाऱ्या तीन ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात झाल्या. ही आग नेमके कोणी लावली, ही बाब उघड झाली नसली तरी अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगणेडीवाल ले-आऊट येथील घटना : अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागीय आयुक्तालयाजवळील गणेडीवाल ले-आऊट येथे रस्ताच्या कडेला उभ्या असणाऱ्या तीन ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात झाल्या. ही आग नेमके कोणी लावली, ही बाब उघड झाली नसली तरी अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मंगळवारी रात्री ११.१५ वाजता गणेडीवाल ले-आऊट येथे ट्रॅव्हल्सला आग लागल्याची माहिती अग्निशमनला मिळाली. त्यानुसार अग्निशमन कर्मचारी तीन पाण्याचे बंब घेऊन काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान तिन्ही ट्रॅव्हल्स आगीच्या विळख्यात होत्या. अग्निशमन कर्मचाºयांनी धगधगणाºया आगीवर पाण्याचा मारा सुरू करून तासभरात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत तीन्ही ट्रॅव्हल्स भस्मसात झाल्या. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.नागपूर हायवेवरील वाहतूक या घटनेमुळे प्रभावित झाली होती. पोलिसांनीही घटनास्थळी पाचारण करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. या आगीत जय गजानन भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ०२९५, एमएच ०४ एफके-०२९४ व एमएच ०७ सी ८६०० जळून खाक झाल्या. या ट्रॅव्हल्स मालक क्षितेज उमक, दीपक शर्मा व मोहंमद कबीर अली खान आहेत.तिन्ही टॅÑव्हल्सला लागलेली आग विझविण्यात आल्यानंतर केवळ टायरच तेवढे शिल्लक असल्याचे आढळून आले.जखमी अग्निशमन कर्मचारी उपचारासाठी ताटकळतआग विझविताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी श्रीकांत जवंजाळ हे किरकोळ जखमी झाले. ते वाहन घेऊन इर्विन रुग्णालयात पोहोचले. तेथे १० रुपयांची पावती घेऊन उपचार करण्यास सांगण्यात आले. आगीच्या घटनास्थळी अचानक जावे लागल्याने त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी काही वेळ ताटकळत बसावे लागले. अखेर अग्निशमनचे वरिष्ठ अधिकारी सय्यद अनवर यांना फोनवरून त्यांनी ही बाब कळविली. ते डॉक्टरांशी बोलले. त्यानंतर उपचार करण्यात आले. जिवाची बाजी लावून आग विझविताना अग्निशमन कर्मचारी जखमी झाला होता. अशा स्थितीतही इर्विन रुग्णालयात त्यांना उपचारासाठी ताटकळत बसावे लागले. ही एक शोकांतिकाच आहे.वेलकम पॉर्इंट हाकेच्या अंतरावरगणेडीवाल लेआऊट येथील रहिवासी उमक यांच्या घराच्या फ्लॅटजवळ नेहमी वाहने पार्क केली जातात. या घटनास्थळापासून वेलकम पॉर्इंट अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्या ठिकाणी पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या  ट्रॅव्हल्स रात्रभर उभ्या केल्या जातात. आगीमुळे त्यांचाही भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात होती.