शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

थ्री स्टार मानांकन, थर्ड पार्टीद्वारे पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:07 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने नगरसेवकांद्वारे प्रमाणीकरून करून महापालिकेच्या पदरी १२५० गुण जमा झालेत. यामुळे अभियानाचे 'थ्री स्टार रँकींग'देखील मिळाले. याची पडताळणी क्यूसीआय टिमद्वारा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देओडीएफचा दावा : स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेची पाच हजार गुणांची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने नगरसेवकांद्वारे प्रमाणीकरून करून महापालिकेच्या पदरी १२५० गुण जमा झालेत. यामुळे अभियानाचे 'थ्री स्टार रँकींग'देखील मिळाले. याची पडताळणी क्यूसीआय टिमद्वारा करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी महापालिकेचा खटाटोप व नगरसेवकांद्वारा दिल्या जाणाऱ्या पत्राची सत्यता किती, हा मात्र संशोधनाचा विषय ठरत असल्याचे वास्तव आहे.स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने महानगराला यंदा पाच हजार गुणांचे सर्वेक्षण राहणार आहे. या अभियानाच्या निकषात बसण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. ही स्वागतार्थ बाब आहे. महानगर हागणदारीमुक्त दाखविण्याच्या धावपळीपेक्षा यासाठीचे प्रयत्न कसोसीने होणे महत्त्वाचे आहे. आजही काही भागातील नागरिक उघड्यावर जातात, ही बाब नाकारता येण्यासारखी नाही. किंबहुना हागणदारीमुक्त शहर दाखविण्यासाठी नगरसेवकांजवळून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रशासनाने कसोसीने प्रयत्न केलेत, ही वस्तुस्थितीदेखील नाकारता येत नाही.या स्वच्छ सर्वेक्षणाचे गुणांकन पाच हजार गुणांचे राहणार आहे. यामध्ये सेवा स्तरावरील प्रगतीसाठी एकूण एक हजार २५० गुण राहणार आहेत. यामध्ये कचरा संकलन आणि वाहतुक, कचºयाची प्रक्रिया व विल्हेवाट, शास्वत कचरा, माहिती शिक्षण, संवाद आणि वर्तमानातील बदल, क्षमता बांधणी आणि वर्तमानातील बदल, क्षमता बांधणी आदी राहणार आहे.महानगर हागणदारी मुक्त झाल्याची क्यूसीआय टीमद्वारा पाहणी करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाणे त्रयस्त पथकाद्वारा पाहणीनंतर व प्रत्यक्ष निरीक्षणाअंती एक हजार २५० गुणांच्या गुणांकनाची परीक्षा राहणार असल्याची माहिती आहे.उघड्यावर कचरा टाकल्यास दंडाची आकारणीया अभियानाच्या अनुषंगाने उघड्यावर कचरा टाकल्यास, उघड्यावर लघुशंका केल्यास मार्गावर घाण केल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, उघड्यावर शौच केल्यास यासंबंधीचा नियम अधिसुचित करून दंडाची आकारणी करण्यात येत असल्याचे सुतोवाच महापालिका प्रसासनाने केले आहे. वास्तविकत: या नियमांच्या अनुषंगाने अवलोकण केल्यास या नियमांचे सर्रास उल्लंघण होत असताना किती प्रकरणात कारवाई करून दंडाची आकारणी केली, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.उपभोक्ता दरानुसार कारवाई कुठे?महापालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि विध्वंसक कचरा विल्हेवाट लावण्याकरिता शहरातील रहिवासी, स्थापत्य अभियंता, बिल्डर्स आणि कंत्राटदार यांना सन २०१६ च्या अधिसुचनेनुसार उपभोक्ता दर निश्चित करून कारवाई करण्याचे सुतोवाच महापालिकेने या अभियानाच्या निमित्ताने केले आहे. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ शहरामध्ये लागू करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.स्वच्छता 'अ‍ॅप'साठी १२५० गुणशहरातील स्वच्छतेबाबत वारंवार असणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महानगरात स्वच्छता 'अ‍ॅप' सुरू करण्यात आलेले स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या पुस्तिकेच्या निर्देशानुसार टूल किटप्रमाणे कार्यवाही महानगर स्तरावर सुरू आहे. स्वच्छता अ‍ॅपसंदर्भात अनेक कार्यक्रमांद्वारे नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप सुरू करण्याचा आग्रह शासन धरत असल्याची चांगली बाब या निमित्ताने समोर आली आहे. या उपक्रमासाठी एक हजार २५० गुण राहणार आहेत.